28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमंत्रालयएक रुपयात पीक विमा योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ

एक रुपयात पीक विमा योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ

मंगळवार, 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय; बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास (क्लस्टर डेव्हलपमेंट) मोठे प्रोत्साहन मिळणार; नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार;

एक रुपयात पीक विमा योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मंगळवार, 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

याशिवाय पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाणार आहे. मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटला चालना देण्यासाठीही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय असे – 

कामगार विभाग

  • कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखो कामगारांचे हित जपले.

कृषी विभाग

  • केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार
  • “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यातही राबविणार.
  • सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. 22.18 कोटी खर्चास मान्यता

 

पर्यटन विभाग

  • महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

उद्योग विभाग

  • राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. 95 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

वस्त्रोद्योग विभाग

  • कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. 25 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

सहकार विभाग

  • सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार

नगरविकास विभाग

  • बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास (क्लस्टर डेव्हलपमेंट) मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात (प्रीमियम) 50 टक्के सवलतीचा निर्णय

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

  • अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची 105 पदांची निर्मिती करणार

हे सुद्धा वाचा :

मंत्रिमंडळात एकही महिला नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव; अजित पवारांची खंत

आता महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Cabinet Expansion : उतावळ्या बंडखोरांना लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सोसवेना !

जलसंपदा विभाग

  • नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त 1710 कोटीच्या खर्चास मान्यता
Maharashtra Cabinet Decision, One Rupee Crop Insurance Scheme, Cabinet Decision, Maharashtra, Mumbai Cluster Development

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी