33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमंत्रालयमनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव

मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव

याबाबत "लय भारी"ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे. यासंदर्भात "लय भारी"ने दोन दिवसांपूर्वीच वृत्त दिले होते. नवीन मुख्य सचिव (CS) म्हणून मनोज सौनिक उद्या पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. सध्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव हे 30 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. 

मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. राज्य सरकारने तसा आदेश काढला आहे. याबाबत “लय भारी”ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे. यासंदर्भात “लय भारी”ने दोन दिवसांपूर्वीच वृत्त दिले होते. नवीन मुख्य सचिव (CS) म्हणून मनोज सौनिक उद्या पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. सध्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव हे 30 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. 

राज्याचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी महाराष्ट्र शासनातर्फे आज मनोज सौनिक यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. अ.शा.प.क्र. एईओ-1023/प्र.क्र.168/2023/ दहा, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक :- 28.04.2023 या संदर्भाने जारी हा आदेश असा – 

प्रिय श्री. सौनिक,
श्री. मनु कुमार श्रीवास्तव, भाप्रसे, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणा-या मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन या पदावर शासनाने आपली नियुक्ती केली आहे. तरी, आपण मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन या पदाचा कार्यभार श्री. मनु कुमार श्रीवास्तव (भाप्रसे) यांच्याकडून दिनांक 30.04.2023 (म.नं.) रोजी स्वीकारावा.
तसेच पुढील आदेश होईपर्यंत आपल्या सध्याच्या अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदाचा तसेच आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून असलेल्या अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत आपण कृपया सांभाळावा.

Manukumar Shrivastav Retiring
मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यासाठी मनोज सौनिक यांच्याकडे पदभार सोपविण्याबाबत काढलेला शासन आदेश.

नितीन गद्रे यांनी महाराष्ट्र शासनातर्फे राज्याचे सध्याचे मुख्य सचिव, मनु कुमार श्रीवास्तव यांच्यासाठी जारी केलेले आदेश असे – 

प्रिय महोदय,
अ.शा.प.क्र. एईओ-1023/प्र.क्र.166/2023/दहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-400032.
दिनांक :- 28.04.2023
प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर आपण दिनांक 30.04.2023 (म.नं.) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. तरी, आपण आपल्या मुख्य सचिव या पदाचा कार्यभार श्री. मनोज सौनिक, भाप्रसे, अपर मुख्य सचिव (वित्त) वित्त विभाग यांच्याकडे सोपवून दिनांक 30.04.2023 (म.नं.) रोजी सेवानिवृत्त व्हावे.
आपल्या सेवा कालावधीमध्ये आपण केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच आपण दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल शासन आपले आभारी आहे. सेवानिवृत्तीनंतरचे आपले आयुष्य सुखाचे आणि समाधानाचे जावो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.

Manoj Saunik CS Lay Bhari
“लय भारी”ने दोन दिवसांपूर्वीच दिलेले वृत्त.

मनुकुमार श्रीवास्तव हे 37 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि मनोज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर या तिघांची नावे चर्चेत होती. मात्र, सेवाज्येष्ठतेनुसार मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Manoj Saunik CS
मनोज सौनिक 1987 च्या बॅचचे बिहार राज्यातील आयएएस अधिकारी आहेत.

1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मनोज सौनिक बिहार राज्यातील असून उत्तम प्रशासक आहेत. त्यांनी विविध विभागाचे सचिवपद भूषविले आहे. पुणे, रायगड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक, धुळे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सौनिक हे 23 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांना मुख्य सचिवपदी कार्य करण्यास आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : 

राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर यांची नावे चर्चेत

1 मेपासून मंत्रालयाचा कारभार पेपरलेस होणार!

IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार खंडणी प्रकरण सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता

30 कोटींची संपत्ती असणाऱ्या IASच्या आजी-आजोबांनी जीवन संपवलं!

नगरविकास आणि महसूल विभागाचा गेली कित्येक वर्षे कार्यभार सांभाळणारे डॉ. नितीन करीर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याने मुख्य सचिव पदावर त्यांची वर्णी लागेल, असे बोलले जात होते. मात्र, राज्यसरकारने सेवाज्येष्ठतेचा नियम पाळून मनोज सौनिक यांना संधी दिली. सेवाज्येष्ठतेमध्ये सध्या तिसऱ्या क्रमांकावर असलेले डॉ. करीर हे मार्च 2024 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सौनिक यांच्या निवृत्तीनंतर करीर यांचा सेवा कालावधी अवघ्या 3 महिन्यांचा राहणार असल्यामुळे त्यांना मुख्य सचिवपदाची हुलकावणी मिळण्याचीही शक्यता आहे.

Manoj Saunik , Manoj Saunik Chief Secretary, Chief Secretary Maharashtra, Manukumar Shrivastav, Lay Bhari News comes true

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी