30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमंत्रालयMantralaya : 'मंत्रालया'च्या नावाने अधिकाऱ्यांची 'वसुली' !

Mantralaya : ‘मंत्रालया’च्या नावाने अधिकाऱ्यांची ‘वसुली’ !

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण, पुणे (बार्टी) या संस्थेकडून बॅंक, रेल्वे, पोलिस व मिलिटरी भरती परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभर प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, परंतु तिथेच आता पैसे उकळण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या सरकारी अधिकारी, नेतेमंडळी, पोलिस अधिकारी यांच्या नावाने पैसे उकळण्याचे सत्रच सुरू झाल्याने राज्यात सध्या चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) काही अधिकारी मंत्रालयाचे नाव वापरून प्रशिक्षण केंद्रांकडून पैसे उकळत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे, परंतु असे काहीच नसल्याचे म्हणत बार्टीकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. काही केंद्रे केवळ दबाव आणण्यासाठी अशी चुकीची तक्रार करीत असल्याचे कारण बार्टीकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे नेमकं पाणी मुरतंय कुठे असा प्रश्नच यानिमित्ताने उभा राहिला आहे. यावर सरकारी यंत्रणा काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण, पुणे (बार्टी) या संस्थेकडून बॅंक, रेल्वे, पोलिस व मिलिटरी भरती परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभर प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. बार्टीचे राज्यात एकूण 30 प्रशिक्षण केंद्रे असून या केंद्रांवर सध्या साडेसात हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सदर कार्यक्रम हा 2018 पासून सुरू झाला असून यातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून विविध शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रांत नोकरी मिळावी म्हणून असे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवण्यात येतात.

हे सुद्धा वाचा…

Education : व्हिजेटीआयचा अजब कारभार, कनिष्ठ शिक्षकाकडे दिले संचालकपद !

Indorama Company : चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार, इंडोरामा कंपनीचा विश्वास

Shiv Sena : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घेणार गटप्रमुखांचा मेळावा

दरम्यान हा कार्यक्रम शासनमान्य असूनही या प्रशिक्षण केंद्रांना नाहक त्रास देण्यात येत असून त्यांच्याकडून शुल्कात तब्बल २१ टक्के दराने रकमेची वसुली करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी त्यांच्या प्रमुखाकडून मोठी रक्कम बार्टी आकारत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्र प्रमुखांनी तक्रार केली असली तरीही त्यांनी याबाबत गोपनीयता पाळण्याच्या अटीवरच ही माहिती उघडकीस आली आहे.

सदर माहिती धक्कादायक स्वरूपाची असून यात 21 टक्के रक्कम न देणाऱ्यांना अनेक महिने प्रशिक्षण शुल्क न देणे, कोणतंतरी कारण देत ते रोखून ठेवणे, कागदपत्रांच्या एका यादीची पूर्तता केली की लगेचच पुन्हा दुसरी यादी हजर असणे शासनाच्या निर्धारित प्रशिक्षण शुल्क टप्प्यांचे उल्लंघन करणे अशा अनेक पद्धतीने बार्टीकडून प्रशिक्षण केंद्रांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे अशा पद्धतीने सुरू असलेल्या जोरजबरदस्तीच्या प्रकारावर प्रशासनाकडून काही पावलं उचलली जाणार का असा सवालच प्रशिक्षण केंद्रांकडून विचारण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी