30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमंत्रालयMantralaya News : बाळासाहेब पाटलांच्या खासगी सचिवांना जायचंय अतुल सावेंकडे !

Mantralaya News : बाळासाहेब पाटलांच्या खासगी सचिवांना जायचंय अतुल सावेंकडे !

‘महाविकास आघाडी सरकार’ कोसळल्यानंतर सगळ्या मंत्र्यांना घरी जावे लागले. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही मोठी पंचाईत झाली. सरकारने नेमून दिलेल्या पदावर काम करण्यापेक्षा मंत्र्यांचे खासगी सचिव (पीएस), विशेष कार्य अधिकारी (ओएसडी), स्वीय सहायक (पीए) म्हणून मिरविण्यात अशा अधिकाऱ्यांना भारी हौस असते.

‘महाविकास आघाडी सरकार’ कोसळल्यानंतर सगळ्या मंत्र्यांना घरी जावे लागले. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही मोठी पंचाईत झाली. सरकारने नेमून दिलेल्या पदावर काम करण्यापेक्षा मंत्र्यांचे खासगी सचिव (पीएस), विशेष कार्य अधिकारी (ओएसडी), स्वीय सहायक (पीए) म्हणून मिरविण्यात अशा अधिकाऱ्यांना भारी हौस असते. मिजाशी मिरवणे, खात्यातील अन्य अधिकाऱ्यांवर गुरगरणे आणि मलई ओरपणे अशा संधी या मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्राप्त होत असतात. त्यामुळे मंत्र्यांकडे काम करण्याची चटक लागलेल्या अधिकाऱ्यांना अन्य पदांवर काम करण्याची इच्छा राहात नाही.

माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही त्यामुळेच पंचाईत झाली आहे. संतोष पाटील नावाचे एक बिलंदर अधिकारी बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात होते. खासगी सचिव हे प्रमुख पद त्यांच्याकडे होते. मंत्री घरी गेल्यामुळे त्यांची खूर्चीही गेली आहे. आता त्यांना नवे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात जायचे आहे. खासगी सचिव हे पद नाही मिळाले तर किमान ओएसडी पदावर तरी संधी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यासाठी त्यांनी सावे यांच्याकडे चकरा मारल्या आहेत.

संतोष पाटील यांनी अतुल सावे यांच्या कार्यालयात घुसण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी त्यांचीच जुने कर्म त्यांना तिथे संधी मिळण्यासाठी अडथळा ठरत आहे. बाळासाहेब पाटील यांच्याकडे कार्यरत असताना संतोष पाटील यांनी बऱ्याच भानगडी केल्या होत्या. या भानगडींची चर्चा संबंध मंत्रालयात दरवळत आहे. बाळासाहेब पाटील यांच्याकडे येण्यापूर्वी हे महाशय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात तत्कालिन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे कार्यरत होते. सहकार खात्याने त्यावेळी अजित पवार यांच्याविरोधात कारवाईला सुरूवात केली होती. या कारवाईची संबंध कागदपत्रे तयार करण्याचे काम संतोष पाटील यांनी केले होते. जेव्हा संतोष पाटील हे बाळासाहेब पाटील यांच्याकडे पीएस म्हणून रूजू झाले तेव्हा त्यांनी अजित पवारांच्या विरोधात केलेल्या बाबी चव्हाट्यावर आल्या.

ganpati bappa contest

हे सुद्धा वाचा

Balasaheb Patil : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची वेसण भाजपच्या सुभाष देशमुखांकडे

अबब ! मंत्री बाळासाहेब पाटील यांचा गाढवछाप कारभार; राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उघडे पाडले पितळ

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्यामुळे माणमधील औद्योगिक कॉरिडॉर कोरेगावला स्थलांतरीत झाला, रामराजे नाईक निंबाळकर यांचा गंभीर आरोप

Chandrakant Patil : पुण्याच्या गर्दीत चर्चा रंगली चंद्रकांतदादांची, वाचा काय घडलं…

Sharad Pawar : गणपती बाप्पाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे विघ्न दूर करावे – शरद पवार

संतोष पाटील यांनी मात्र त्या कारवाईशी आपला काहीच संबंध नव्हता अशी सारवासारव केली. एवढेच नव्हे तर बाळासाहेब पाटील यांच्याकडे आपण निष्ठेने काम करू. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून येणाऱ्या सुचनांचे पालन करू असाही ‘प्रोटोकॉल’ सांभाळण्याची तयारी त्यांनी दाखविली. बाळासाहेब पाटील यांच्याकडे त्यांनी पद्धतशीरपणे हा प्रोटोकॉल सांभाळल्यामुळेच प्रवीण दरेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने कारवाई केली. प्रवीण दरेकर यांना त्यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्षपद सुद्धा सोडावे लागले होते.भाजपप्रणीत एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची जुनीच एक भूमिका कायम ठेवली आहे. मागील सरकारमधील काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडील अधिकाऱ्यांना नव्या सरकारच्या मंत्री कार्यालयात येऊ द्यायचे नाही. फडणवीस यांची ही भूमिका आता संतोष पाटील यांच्यासाठी जाचक ठरली आहे.

माझ्या निष्ठा राष्ट्रावादीसोबत कधीच नव्हत्या. मी भाजपसोबतच निष्ठा बाळगेन. प्रवीण दरेकरांच्या प्रकरणामध्ये माझा काहीही संबंध नव्हता, असे पाटील यांना पटवून द्यावे लागेल. त्यामुळे संतोष पाटील यांना ठेवून घ्यायचे का याचा विचार अतुल सावे यांना करावा लागणार आहे. त्यासाठी सावे यांना फडणवीस यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. या सगळ्या घोळात बिचाऱ्या संतोष पाटील यांना मात्र नवी खूर्ची मिळविण्यात अडचणी येत आहेत.
इतके लांगूलचालन करण्यापेक्षा स्वाभिमान जागृत ठेवून सरकार नेमून देईल, त्या ठिकाणी इमाने इतबारे नोकरी करायची, असा बाणेदारपणा संतोष पाटील दाखवतील का असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

दुसऱ्या अधिकाऱ्याचेही प्रयत्न सुरू

बाळासाहेब पाटील यांच्याकडे शहाजी पाटील नावाचे आणखी एक ओएसडी होते. ते बंगल्यवार बसायचे. तेथून फायली क्लियर करायचे. अर्थपूर्ण कामांत त्यांचे योगदान मोलाचे होते. विशेषतः अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. पण अचानक महाविकास आघाडी सरकार गेल्याने बदल्या होऊ शकल्या नाहीत. आता अतुल सावे यांच्या कार्यालयात जायचे आणि बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात ठरलेल्या व अपूर्ण राहिलेल्या बदल्या मार्गी लावायच्या असा शहाजी पाटील यांचा इरादा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी