29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमंत्रालयमंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

टीम लय भारी

मुंबई :- स्वतःच्या पदरात काही पाडून घ्यायचे असेल तर मनुष्य किती खालच्या थराला जातो याचे संतापजनक उदाहरण समोर आले आहे. हा प्रकार केला आहे, मंत्रालयातील (Mantralya officers illegal act for self promotion)  उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी.

गेल्या दहा–बारा दिवसांपूर्वी मंत्रालयात 31 उपसचिव अधिकाऱ्यांना सहसचिव म्हणून पदोन्नती मिळाली (31 officers promoted in Mantralaya). ही पदोन्नती घेताना त्यांनी न्यायालयाच्या सुचनेचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले आहे.

 

Ministry officials reluctant, contempt of court for promotion, kept Uddhav Thackeray in the dark
मंत्रालय

उपसचिव, सहसचिव पदोन्नतीमध्ये ‘गडबड गोंधळ’; मंत्रालयात ‘कही खुशी, कही गम’

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

अवरसचिव पदावरील अंदाजे 40 अधिकाऱ्यांच्या सुद्धा उपसचिव म्हणून पदोन्नती रखडलेल्या आहेत (Under Secretary is also due for Promotion). परंतु न्यायालयाच्या मनाई आदेशामुळे या पदोन्नती करता येणार नाहीत, असे वरिष्ठ (सहसचिव पदोन्नती घेतलेले) अधिकारी सांगत आहेत.

न्यायालयाचे कारण पुढे करून अवर सचिवांची पदोन्नती नाकारली जात आहे. पण उपसचिव पदावरून सहसचिव पदावर स्वतःच्या पदोन्नती घेताना या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या सुचना दिसल्या नाहीत का असा सवाल आता मंत्रालयातील अन्य अधिकारी करीत आहेत.

न्यायालयाचा आदेश काय होता?

दिव्यांगांच्या पदोन्नतीचे धोरण निश्चित होत नाही, तोपर्यंत अन्य कोणत्याही पदोन्नती देवू नयेत अशा न्यायालयानेच सुचना केल्या आहेत. याबाबतचे एक पत्र उच्च न्यायालयातील सरकारी वकीलांनी 14 जून रोजी पाठविले आहे.

सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हे पत्र दाबून ठेवले, व 15 जून रोजी स्वतःच्या (उपसचिव ते सह सचिव) पदोन्नती करून घेतल्या.

स्वतःच्या पदोन्नतीच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बेमालूमपणे स्वाक्षरी करून घेतली. ही स्वाक्षरी होण्यापूर्वी 14 जून रोजीच्या पत्राची माहिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायला हवी होती.

Ministry officials reluctant, contempt of court for promotion, kept Uddhav Thackeray in the dark
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

भाजपच्या आंदोलनावर अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांचे टीकास्त्र

Uddhav Thackeray asks 7 Maharashtra districts to increase Covid-19 testing, vaccinations

मुख्यमंत्र्यांना ती माहिती दिली असती तर, मुख्यमंत्र्यांनी फाईलवर स्वाक्षरी न करता फाईल परत पाठविली असती. म्हणून मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवले (Mantaralaya officers misguided to Uddhav Thackeray). 14 जूनचे पत्र धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांनी चलाखी करीत 15 जून रोजी पदोन्नतीचा आदेशही जारी केला.

हे अधिकारी इतके बेरकी आहेत की, अन्य अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला मात्र त्यांनी कोलदांडा घालून ठेवला आहे (Double stand of Mantralaya officers in Promotion).  न्यायालयाचे पत्र असल्याने पदोन्नती करता येत नाहीत, असा साळसूदपणाचा आव या अधिकाऱ्यांनी आणला आहे. स्वतःच्या पदोन्नतीच्या वेळी न्यायालयाच्या सुचना दिसल्या नाहीत का, असा सवाल आता अन्य अधिकारी करीत आहेत.

सामान्य प्रशासन विभागातील कळीचे नारद

सामान्य प्रशासन विभागात काही अधिकारी आहेत. त्यांनी अन्य उपसचिव पदावरील दांडग्या अधिकाऱ्यांसोबत स्वतःचे टोळके तयार केले आहे.

या 31 जणांच्या टोळक्याने नियोजनबद्धपणे स्वतःच्याच पदोन्नती करवून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या 31 जणांनी सरकारची दिशाभूल केली आहे (31 officers misguided to Uddhav Thackeray for self promotion).

सामान्य प्रशासन विभागातील डेस्क क्रमांक 13 व डेस्क क्रमांक 14 वरील अधिकाऱ्यांनी हा घोळ घालून ठेवला आहे. यातील एका डेस्कवरील अधिकाऱ्याची सहसचिव म्हणून पदोन्नती होणार होती. म्हणून त्यांनी मैत्रीसंबंध असलेल्या दुसऱ्या डेस्कवरील उपसचिवासोबत संधान साधले. व हे सगळे कारस्थान घडवून आणल्याचे सूत्रांनी सांगितले (Vested interested officers in Mantralaya).

सहसचिव पदोन्नती झालेल्या या अधिकाऱ्याला आता क्रीम पोस्ट मिळण्याची हाव सुटली आहे. त्यांनी गृह विभागात (एक्साईज) वर्णी लागावी म्हणून जोरदार फिल्डींग लावली आहे. ‘कुंपणच शेत खाते’ यातला हा प्रकार असल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी