काळानुसार संवादाची साधने बदलत जातात. आताचा जमाना हा माहिती आणि तंत्राचा आहे. या माध्यमांचा वापर आता सरसकट सगळेच करत आहेत. यात आता आपल्या राज्याचे मंत्रीही कमी नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनतेत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रात ९ वर्षापासून मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत आहे. या सरकारचे धोरणे, विविध कामे ते जाहिरातीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी या सरकारने गेल्या ९ वर्षात कोट्यवधी रुपये खर्च केले. आता महाराष्ट्र सरकारनेही जाहिरातीच्या माध्यमातून जनतेत जाण्याचा प्रयत्न केला. पण तो काही यशस्वी झाला नाही.
सरकारविरोधात जनतेत रोष आहे. त्यामुळेच की काय भाजपने केलेल्या विविध सर्वे आणि संघाच्या प्रबोधिनी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सरकार विरोधात जनभावना असून त्याचा फटका सरकारला बसणार अशी भीती व्यक्त केली. सरकारने केलेली विविध विकास कामे घेऊन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सरकार आपल्या दरी हा उपक्रम राबवत आहे. पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच की काय सरकारने आता व्हॉट्सअपवरून आपल्या योजना, केलेली कामे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हे सुद्धा वाचा
टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; तीन ते पाच रुपये किलोपर्यंत खाली
‘राम मंदिर बॉम्बने उडवणार..’ धमकीच्या फोननंतर अयोध्येत अलर्ट जारी!
चांद्रयान मोहिमेची आरास ठरतेय गणेश भक्तांचं आकर्षण
‘व्हॉट्सअपवरून आपल्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे. या नवीन संपर्क माध्यमाचा उपयोग करून आपण माझ्या रोजच्या कामाबद्दल आणि निर्णयांबद्दल जाणून घेऊ शकता. चला तर, व्हॉट्सअप चॅनेलच्या माध्यमातून आपण आता नित्य संपर्कात राहूया’ असे आवाहन करत, सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला या नव्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयानेही या माध्यमातून जनतेस आपण करत असलेली कामे पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.