33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमंत्रालयमहापालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढणार

महापालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढणार

महानगरपालिकांच्या (Municipalities) कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने स्विकृत नगरसेवकांची (Nominated members)संख्या वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंगळवारी (दि.१०) रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. (municipalities In will increase number of nominated members)

राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड स्विकृत नगरसेवक (नामनिर्देशित सदस्य) म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या स्विकृत नगरसेवकांच्या ज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने स्विकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

जिओ 5G : फ्री ट्रायल ऑफर कशी मिळेल ते जाणून घ्या; वापरुन पाहा अन् स्पीडचा फरक अनुभवा !

अजित पवार किस झाड की पत्ती; पवार घराणं राजकारणातून उखडून टाकणार!

एसी लोकलचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवाशांची कोंडी

मुंबई महानगरपालिका अधनियमाच्या कलम 5(1)(ब) मध्ये दहा नामनिर्देशित सदस्य व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(2)(ब) मध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाहीत किंवा दहा पालिका सदस्य, यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला. तसेच, याबाबत राज्याचे महाधिवक्ता यांचा प्रथम अभिप्राय घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 5(1)(ब) व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 5(2)(ब) मध्ये नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या महानगरपालिकांतील नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या पाच आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी