29 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमंत्रालयसाहित्यिक-संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे 'पद्मश्री'ने सन्मानित

साहित्यिक-संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे ‘पद्मश्री’ने सन्मानित

प्रा. डॉ. प्रभाकर मांडे यांच्या सामाजिक समरसता टीममध्ये रमेश पतंगे, नामदेवराव घाडगे, अनिरूद्ध देशपांडे, दादा इदाते, नाना नवले या समाजात तळागाळात काम करणाऱ्या विचारवंत, कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यातील प्रा. डॉ. प्रभाकर मांडे आणि रमेश पतंगे दादा इदाते या तिघांचा आज एकाचवेळी पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला. संघ वर्तुळातील कार्यकर्त्यांसाठी ही अत्यंत उत्साहाची व आयुष्यभर निष्ठेने केलेल्या कार्याला पोचपावती मिळाल्याची भावना ठरली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक-संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे ‘पद्मश्री’ने सन्मानित केले गेले. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांनी पद्मश्री सन्मान स्वीकारला. (PadmaShri Prof. Dr. Prabhakar Sadashiv Mande) संशोधनाचा महामेरू अशीही त्यांची ओळख आहे.

प्रा. डॉ. प्रभाकर मांडे हे ‘महाराष्ट्रातील सामाजिक समरसता’ या संकल्पनेचे भाष्यकार मानले जातात. डॉ. मांडे यांच्या सामाजिक समरसता टीममध्ये रमेश पतंगे, नामदेवराव घाडगे, अनिरूद्ध देशपांडे, दादा इदाते, नाना नवले या समाजात तळागाळात काम करणाऱ्या विचारवंत, कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यातील प्रा. डॉ. प्रभाकर मांडे आणि रमेश पतंगे दादा इदाते या तिघांचा आज एकाचवेळी पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला. संघ वर्तुळातील कार्यकर्त्यांसाठी ही अत्यंत उत्साहाची व आयुष्यभर निष्ठेने केलेल्या कार्याला पोचपावती मिळाल्याची भावना ठरली आहे.

लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणार्‍या प्रा. डॉ. मांडे यांनी “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाड्याबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरुप, दलित साहित्याचे निराळेपण” या पुस्तकांसह “महानुभवीय पद्यपुराण, लोकरंगकला आणि नागर रंगभूमी अशी संपादने केली.

डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, ‘एम.ए.बी.एड’ ‘पीएच.डी’, ‘डि.लिट.’ त्यांचा जन्म दि. 16 डिसेंबर, 1933 रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते औरंगाबाद शहरात आले. त्यांनी आपले संपूर्ण उच्च शिक्षण याच नगरीत पूर्ण केले. 1955 ते 1993 अशी 39 वर्षे ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. शिक्षक, व्याख्याता,प्रपाठक, प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख अशा विविध पदांवर शालेय, महाविद्यालयीन व विद्यालयीन स्तरावर त्यांनी श्रमदान व संशोधनाचे कार्य केले.

mande

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठयेथून मराठी विभाग प्रमुख या पदावरून ते तेथील 20 वर्षांच्या सेवेनंतर 1993 साली निवृत्त झाले. निवृत्ती नंतरही धुळे येथील का. स. वाणी प्रगत मराठी अध्ययन केंद्रांत संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्थेचे ते दोन वर्षे संचालक होते. त्यानंतरही त्यांनी आपलेसंशोधन व ग्रंथ लेखन हे कार्य अविश्रांतपणे सुरू ठेवले.

PadmaShri Prof. Dr. Prabhakar Sadashiv Mande, प्रा. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे , Prof. Dr. Prabhakar Mande, डॉ. प्रभाकर मांडे, PadmaShri Dr. Prabhakar Mande

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी