31 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमंत्रालयमंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे; कार्यवाहपदी प्रवीण पुरो

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे; कार्यवाहपदी प्रवीण पुरो

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची तर कार्यवाहपदी प्रवीण पुरो यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी प्रमोद डोईफोडे यांना सर्वाधिक 78 मते मिळून ते विजयी झाले. राजा आदाटे यांना 49 तर दिलीप जाधव यांना 28 मते मिळाली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची तर कार्यवाहपदी प्रवीण पुरो यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी प्रमोद डोईफोडे यांना सर्वाधिक 78 मते मिळून ते विजयी झाले. राजा आदाटे यांना 49 तर दिलीप जाधव यांना 28 मते मिळाली. (Pramod Doifode Elected President Mantralaya VidhiMandal Vartahar Sangh Pravin Puro KaryaVah)

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची दवैवार्षिक निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. दिवसभर मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन पारकर यांनी काम पाहिले. सर्व कार्यकारिणी आणि संघाच्या सदस्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सदस्य प्रमोद डोईफोडे यांनी ‘लय भारी’ला सांगितले. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची प्रतिष्ठा जपण्यावर; तसेच सर्व सदस्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर  आपला भर राहील, असेही त्यांनी सांगितले.

Pramod Doifode Pravin Puro मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या उपाध्यक्षपदी महेश पवार 

कार्यवाह पदासाठी प्रवीण पुरो यांना 85 तर मिलिंद लिमये यांना 71 मते मिळाली. उपाध्यक्षपदी 58 मते घेऊन महेश पवार हे विजयी झाले. पांडुरंग मस्के यांना 41, राजेंद्र थोरात यांना 30 तर नेहा पुरव यांना 29 मते मिळाली. कोषाध्यक्षपदी 67 मतांसह विनोद यादव हे विजयी झाले. प्रवीण राऊत यांना 50, तर किशोर आपटे यांना 36 मते मिळाली.

हे सुद्धा वाचा : 

एकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

Maharashtra Monsoon Session 2022 : आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांना बनवला ‘कुस्तीचा आखाडा’

‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’

कार्यकारिणी सदस्यपदी सर्वाधिक 71 मतांनी आलोक देशपांडे यांच्यासह मनोज मोघे (68), कमलाकर वाणी (61), खंडुराज गायकवाड (59) आणि भगवान परब (58) यांची वर्णी लागली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी वार्ताहर कक्षात जाऊन संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संघाचे वर्तमान अध्यक्ष मंदार परब हेही उपस्थित होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी