30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमंत्रालयपीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच...

पीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच जागेवर

टीम लय भारी

मुंबई : ‘सार्वजनिक बांधकाम खात्या’च्या (PWD) ‘इलाखा’ विभागाचा मोठा नावलौकीक आहे. हा लौकीक संपादन झालेला आहे, तेथील अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीमुळे. अधिकाऱ्यांची ही कर्तबगारी कामांमध्ये दिसत नाही, ती दिसते ‘घोटाळ्यां’मध्ये (PWD executive engineers has kept the clerk managing the tender).

प्रस्तुत प्रकरण आहे, संजय इंदूलकर व चंद्रकांत नाईक या दोन कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यकाळातील. इलाखा विभागाचे चंद्रकांत नाईक हे विद्यमान कार्यकारी अभियंता आहेत. नव्यानेच ते या ठिकाणी रूजू झाले आहेत. यापूर्वी संजय इंदूलकर या पदावर होते.

खळबळजनक : पीडब्ल्यूडीतील मोठा घोटाळा, घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी मंत्रालयात शिजतेय कारस्थान

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याकडून कंत्राटदारांची छळवणूक!

इंदूलकर गेले, नाईक आले. पण तिथे विद्या कुलकर्णी नावाच्या एक लिपीक आहेत. त्या जवळपास ७ वर्षांपासून मलईदार डेस्कवर काम करीत आहेत. निविदांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे (He is responsible for tenders). कुलकर्णी यांची पदोन्नती झाली, तर त्यांचा डेस्क मात्र बदलला गेला नाही.

सरकारचे नियम, कायदे काहीही असो. निविदा मॅनेज करण्याचे तंत्र कुलकर्णी यांना व्यवस्थित माहीत आहे. कोणत्या ठेकदाराला काम द्यायचे, कुणाचे काम काढून घ्यायचे. कोणता कंत्राटदार ‘कामाचा,’ कोणता बिनकामाचा हे कुलकर्णी यांना लगेच ओळखता येते.

सनदी अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान, पीडब्ल्यूडीत ३५८ कोटीचा घोटाळा

ED attaches assets worth Rs 5.73 crore of NCP leader Eknath Khadse

निविदा मॅनेज करण्यात कुलकर्णी चांगल्याच पटाईत आहेत. त्यामुळे इलाखा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे काम हलके होते. कुलकर्णी यांच्या या कौशल्याचा मोठा फायदा इंदूलकर यांनी करून घेतला होता. आता नाईक हे सुद्धा पद्धतशीरपणे हात मारत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी ‘लय भारी’शी बोलताना केला (The allegation was made by social activist Vilas Patil while talking to ‘Laya Bhari’).

खरेतर, तीन वर्षात बदली करण्याचा नियम आहे. परंतु कुलकर्णी यांची बदली जवळपास ७ वर्षांपासून झालेली नाही. कार्यकारी अभियंता यांना मलई मिळविण्यासाठी मदत व्हावी यासाठीच कुलकर्णी यांची बदली केली जात नसल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी