28 C
Mumbai
Monday, April 3, 2023
घरमंत्रालयसावरकरांनी शिवरायांची नेमकी काय बदनामी केली ?

सावरकरांनी शिवरायांची नेमकी काय बदनामी केली ?

सावरकरांनी शिवरायांची नेमकी काय बदनामी केली ? याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न "लय भारी"ने केला. तेव्हा 'सहा सोनेरी पाने' आणि 'हिंदुपद पातशाही' या विनायक दामोदर सावरकर लिखित पुस्तकातील काही लिखाणावर अनेकांचे आक्षेप असल्याचे समोर आले. शिवराज जोगदंड पाटील या युझरने तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर हा आक्षेप नोंदविल्याचे दिसून आले. छावा संघटना आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनीही यापूर्वी विनायक सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने' आणि 'हिंदुपद पातशाही' या पुस्तकावर बंदीची मागणी करत आंदोलन केले होते. डॉ. संग्राम पाटील, कॉँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि इतिहासाचे अभ्यासक डॉ. सुरेश खैरनार या तिघांचे व्हिडिओ पाहिले तर आपल्याला अनेक धक्के बसतात. सावरकरांनी शिवरायांचा गौरव राखला नाही, अशी भावनाही मनात येऊ शकते.

सावरकरांनी शिवरायांची नेमकी काय बदनामी केली ? हा प्रश्न अनेकांना नेहमी पडलेला असतो. “लय भारी”नेही याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘सहा सोनेरी पाने’ आणि ‘हिंदुपद पातशाही’ या विनायक दामोदर सावरकर लिखित पुस्तकातील काही लिखाणावर अनेकांचे आक्षेप असल्याचे समोर आले. शिवराज जोगदंड पाटील या युझरने तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर हा आक्षेप नोंदविल्याचे दिसून आले. छावा संघटना आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनीही यापूर्वी विनायक सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ आणि ‘हिंदुपद पातशाही’ या पुस्तकावर बंदीची मागणी करत आंदोलन केले होते.

सावरकरांनी शिवरायांच्या केलेल्या बदनामीविरोधात आंदोलनाची दखल घेऊन TV9 या वृत्तवाहिनेने या विषयावर यापूर्वी चर्चा घडवून आणली होती. त्याचाच संदर्भ देत निलेश जगताप या शिवप्रेमी अभ्यासक, शिवव्याख्यात्याने “छत्रपतींची बदनामी करणारे सावरकर” अशी पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

 
 ☝︎☝︎ सावरकरांचं ||सहा सोनेरी पाने ||नावाचं पुस्तक वाचून तुम्हालाही धक्का बसेल|| डॉ. संग्राम पाटील

निलेश जगताप “छत्रपतींची बदनामी करणारे सावरकर” या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात –
विनायक सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘हिंदुपद पातशाही’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल पुढील विधाने केली आहेत.

1. सावरकरांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज –
“काक कैयत नितीप्रमाणे शिवाजी राजा झाला. नायतर त्याची योग्यता नव्हती”. 
म्हणजे, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक घात याप्रमाणे शिवाजी महाराज राजा झाले. त्यांची ती पात्रता नव्हती.
सौजन्य : Mahesh Patil - Benadikar यांचे ट्विटर अकाऊंट (@MaheshPatil_B)
सौजन्य : Mahesh Patil – Benadikar यांचे ट्विटर अकाऊंट (@MaheshPatil_B)
2. सावरकरांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज –
“मदिरा आणि मादिरक्षित कैकाड बुडालेला नादान नालायक संभाजी”
Mahesh Patil - Benadikar (@MaheshPatil_B) यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन साभार
Mahesh Patil – Benadikar (@MaheshPatil_B) यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन साभार

 
☝︎☝︎ सावरकर ने छ. शिवाजी महाराज तथा डॉ. आंबेडकर की कैसे की बदनामी? Dr. Suresh Khairnar 

निलेश जगताप म्हणतात, “सावरकरांचे देशासाठी काय योगदान आहे नाही, याच्याशी मला काहीही घेणेदेणे नाही, आमच्या राजांबद्दल बोलण्याची सावरकरांची xxx तरी आहे का? ज्यांना xxx नीट नेसता येत नाही, ते आम्हाला मराठ्यांचा इतिहास शिकवणार ? ज्यांच्या बापजन्मात कधी हातात तलवार धरली नाही, त्यांना काय कळणार आमचा इतिहास ?”

 
☝︎☝︎ VIDEO : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सावरकर भाजपाला मान्य आहेत का?

शिवरायांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर लिहिताना सावरकर xxx आणि xxx यांच्या कैफात बुडाले होते की काय ? असा संतप्त सवाल निलेश जगताप यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे. “नेहमी आमचे सावरकर असे, आमचे सावरकर तसे, असे जगाला ओरडून सांगणाऱ्या सावरकरप्रेमीनो…. आता बोला, सावरकरचा वारसा सांगणाऱ्या, “शिवद्रोह्यानो” आता जरा मदिरेच्या धुंदीतून बाहेर पडा आणि यावर आपली प्रतिक्रिया द्या?” असे आवाहनही जगताप यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : 

पंतप्रधान मोदी यांनी दोन वेळा शिवरायांचा उल्लेख केला, पण राज्यपालांना खडे बोल सुनावले नाहीत!

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीचा शिंदे सरकारला विसर

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते : देवेंद्र फडणवीस

Savarkar defame Shivaray, Savarkar Defame Shivaji Maharaj, Saha Soneri Pane, HinduPad PatShahi

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी