29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमंत्रालय'एसटी'ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम अजूनही सुरू; अधिकृत MSRTC थांबे, ढाबे, हॉटेल्सना...

‘एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम अजूनही सुरू; अधिकृत MSRTC थांबे, ढाबे, हॉटेल्सना बंधनकारक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नव्याने जारी केले परिपत्रक; उद्धव सरकारने सुरू केलेल्या चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबत नाराजी; हॉटेल व्यवस्थापनावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश; याशिवाय, ST अधिकृत थांब्यांवर पाणी बाटलीची 15 रुपयांपेक्षा जादा दरात विक्री करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा

उद्धव सरकारने सुरू केलेली ‘एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम अजूनही सुरू आहे. ही योजना अधिकृत MSRTC थांबे, ढाबे, हॉटेल्सना बंधनकारक आहे. त्यासंदर्भात 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नव्याने परिपत्रक जारी केले आहे. चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त होत असल्याने हॉटेल व्यवस्थापनावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महामंडळाने विभागीय व जिल्हा स्तरावरील नियंत्रक कार्यालयांना दिले आहेत. याशिवाय, ST अधिकृत थांब्यांवर पाणी बाटलीची 15 रुपयांपेक्षा जादा दरात विक्री करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

सोशल मीडियातून गेल्या काही दिवसांपासून या 30 रुपयांत चहा-नाश्ता योजनेची चर्चा सुरू आहे. त्याबाबत शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने ‘एसटी’च्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी 25 मे रोजी आदेश काढले आहेत. “नाथजल पाणी बाटली छापील किंमतीपेक्षा जादा दरात विक्री होत असल्याबाबत व रा.प. अधिकृत खाजगी थांब्यांवर रु. 30/- मध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबत” हे परिपत्रक आहे. (क्र. राप/निवप/वाआ/555)

MSRTC Breakfast 30 Rs Scheme 'एसटी'ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम
‘एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील आघाडी सरकारने घेतलेला जनहिताचा निर्णय फडणवीस-शिंदे सरकारने कायम ठेवला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, गडचिरोली विभाग नियंत्रकास यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ST ने नव्याने जारी केलेले परिपत्रक असे –

गेल्या काही दिवसांपासून नाथजल या प्रकल्पाबाबत बस स्थानकातील वाणिज्य आस्थापना परवानाधारक, नाथजल वितरक गालबोट लावत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सोशल मीडियावरही यासंदर्भातील चर्चेत तक्रारींचा सूर उमटत आहेत. रा.प. बस स्थानकावरील कार्यरत पर्यवेक्षक व अधिकारी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा सूर जनमाणसात दिसून येत आहे.

 

रा. प. अधिकृत खाजगी थांब्यांवर रु. 30/- मध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबतच्या तक्रारीसुद्धा जोर धरत आहेत. एसटी महामंडळामार्फत अधिकृत खाजगी हॉटेलचे निवडपत्र विभागास देताना, रा.प. प्रवाशांना अधिकृत खाजगी हॉटेल मालकाने रु.30/- मध्ये चहा-नाश्ता उपलब्ध करुन देण्याचे बंधन हॉटेल थांबा मालकास घालण्यात येते. ST विभागाने तसे बंधपत्र हॉटेल मालकाकडून घेतल्यानंतरच अधिकृत थांब्याचा प्रस्ताव संयुक्त समितीच्या मान्यतेस सादर करुन मान्यता देण्यात येते. रु.30/- मध्ये चहा-नाश्ता योजनेच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्र. राप/निवप / वाआ/3118, दि.2/1/2019 अन्वये कार्यवाही करणे क्रमप्राप्त असताना, प्रवाशी हितास्तव असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर विभागामार्फत / आगारामार्फत करण्यात येत नाही. नमूद  योजनांची विभागामार्फत/आगारामार्फत दक्षतेने कार्यवाही न करणाऱ्या रा.प. पर्यवेक्षकांवर, अधिकाऱ्यांवरही कार्यवाही अथवा जबाबदारी निश्चित होत नाही, ही खेदाची बाब आहे.

 

जर प्रवाशांना ST बस थांबलेल्या ठिकाणी 30 रुपयांत चहा-नाश्ता दिला जात नसेल किंवा पाणी बाटलीसाठी 15 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असेल, तर तात्काळ संबंधित बसच्या चालक-वाहकाकडे तक्रार करावी. वाहकाकडे तक्रार पुस्तक उपलब्ध असते. त्यात लेखी तक्रार करावी. येणाऱ्या जवळच्या थांबा असलेल्या आगारातील नियंत्रकाकडे लेखी तक्रार करावी. याशिवाय, पुढील मध्यवर्ती कार्यालयातही तक्रार करता येईल – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी), नियोजन व पणन खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई-4000008 दूरध्वनी क्र. 022-23023939 ई-मेल : [email protected]

ऑनलाईन तक्रार नोंदवा – https://cutt.ly/ST-Online-Complaint-

सबब, पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत –

    1. सर्व बसस्थानकांवर रा.प. वाणिज्य आस्थापना परवानाधारक, नाथजल वितरकाचे फेरी परवानाधारक नाथजल पाणी बाटली छापील महत्तम विक्री किंमतीपेक्षा (MRP) जादा दरात विक्री करीत आहेत किंवा कसे, याची दैनंदिन खातरजमा करण्याची जबाबदारी कर्तव्यावरील वाहतूक पर्यवेक्षकांचीच राहील. नाथजल पाणी बाटलीची 15 रुपयांपेक्षा जादा दरात विक्री होत असल्याची प्रवाशी तक्रार आल्यास तातडीने तपासणी करावी. कारवाई करण्यात हयगयपणा करताना आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक व आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
    2. रा. प. अधिकृत खाजगी थांब्यांवर प्रवाशांना अधिकृत खाजगी हॉटेल मालकाने रु. 30/- मध्ये चहा नाश्ता उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त आहे. सबब, या कार्यालयाचे पत्र क्र. राप/निवप / वाआ/ 3118, दि.2/1/2019 मध्ये नमूद केल्यानुसार अधिकृत खाजगी हॉटेल मालक कार्यवाही प्रत्यक्षात करतात किंवा कसे, याची खातरजमा मार्गतपासणी पथकांनी, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक व विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रवास करताना / तपासणी करताना नियमितपणे करणे क्रमप्राप्त आहे. सदर योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यास, तातडीने हॉटेल व्यवस्थापनास सदर बाब निदर्शनास आणून, अनुषंगीक सूचना करुन, ज्या विभागाचे अखत्यारीत सदर अधिकृत थांबा येतो, त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करणे आवश्यक आहे, जेणेकरुन संबंधित खाजगी हॉटेल व्यवस्थापनावर तात्काळ कारवाई करणे शक्य होईल व भविष्यातील प्रवाशी तक्रारी टाळता येईल.
    3. प्रवाशी हितास्तव राबविण्यात येणाऱ्या नमूद योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर (विभागातर्फे / आगारातर्फे) होते किंवा कसे, याची तपासणी वेळोवेळी विभागांमार्फत / प्रदेशांमार्फत दक्षतेने करण्यात यावी. प्रवासी तक्रारीस वाव मिळू नये याकरीता, विषयात नमूद बाबींबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना विभागाने वेळोवेळी कराव्यात. नमूद  सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
STs Rs 30 Tea Breakfast Scheme ‘एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम
30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीमबाबत एसटीने नव्याने जारी केलेले परिपत्रक
STs Rs 30 Tea Breakfast Scheme ‘एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम
30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीमबाबत एसटीने नव्याने जारी केलेले परिपत्रक – 1

हे सुद्धा वाचा : 

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे युद्धात जिंकले व तहात हारले अशीच अवस्था : श्रीरंग बरगे

एसटीच्या 100 ई-बस जूनअखेर मुंबई-पुणे मार्गावर धावणार

एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी सदाभाऊ खोत आणि पडळकरांचीही चौकशी करा : अतुल लोंढे

Hotel Gondhali Wada Dhule MSRTC ने अधिकृत केलेल्या ST बस थांबा साखळीतील एक हॉटेल
MSRTC ने अधिकृत केलेल्या ST बस थांबा साखळीतील एक हॉटेल

STs Rs 30 Tea Breakfast Scheme , STs Rs 30 Tea Breakfast Scheme Still In Force, 30 Rs Tea Breakfast Scheme, Authorised MSRTC Stop, Official ST Dhabas Hotels

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी