30 C
Mumbai
Wednesday, September 13, 2023
घरमंत्रालयमुख्यमंत्री कार्यालयातील बोगस ओएसडी अधिकाऱ्याची रवानगी मूळ पदावर

मुख्यमंत्री कार्यालयातील बोगस ओएसडी अधिकाऱ्याची रवानगी मूळ पदावर

बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय हादरल्यानंतर या कर्मचाऱ्याची त्याच्या मूळ जागी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अचलपूर नगरपालिकेत तृतीयश्रेणी कर्मचारी असलेला मयूर ठाकरे हा गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वावरत होता. अखेर त्याचे बिंग फुटल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्रे फिरल्यावर त्याची रवानगी मूळ जागेवर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला आहे. याबाबतचे ‘बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात’ असे शीर्षक असलेले वृत्त ‘लय भारी’ ने दिले होते.

राज्यातील जनतेचे आशास्थान म्हणजे मंत्रालय. राज्याचे मंत्रीमंडळ, सचिव यांच्या बसण्याची हक्काची जागा. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री कार्यालयात कायम राज्यातील अडल्या नडलेल्यांची गर्दी असते. असे असताना या कार्यालय परिसरात भुरट्यांची कमी नाही. विविध कामे करून देणारे दलाल मुख्यमंत्री कार्यालय परिसरात फिरत असतात. एखादी व्यक्ती फसवली गेली की अशा मंडळींचे बिंग फुटते. राज्यात अनेक सरकार आले आणि गेले पण दलाल मंडळींची चलती काही कमी झालेली नाही. असे असतानाच मुख्यमंत्री सचिवालयाचे ओळखपत्र तयार करून ‘ओएसडी’ बनलेल्या एका लखोबा लोखंडेने सरकारच्या तिजोरीतून पगारही काढल्याचे निदर्शनास आले असून सह्याद्री अतिथिगृहातच त्याचे पितळ उघडे पडले आहे. मयूर ठाकरे असे या भामट्याचे नाव आहे.

अचलपूर नगरपालिकेतील तृतीयश्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे हा गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वावरत होता. त्यापलीकडे सह्याद्री, वर्षा आणि नंदनवन या बंगल्यावरही त्याचा राबता होता. या ठिकाणांची नेत्यांची वर्दळ आणि त्यांच्याकडच्या कामांचे स्वरूप हेरून मयूर याने मुख्यमंत्र्यांचा ‘ओएसडी’ असल्याचे भासवले. त्याचा फायदा होत असल्याचे लक्षात येताच त्याने अचलपूर नगरपाालिकेतून थेट मंत्रालयात तेही मुख्यमंत्री सचिवालयातच रूजू झाल्याचे दाखवून दिले. त्यासाठी खोटे नियुक्तीपत्र, त्याआधी प्रतिनियुक्तीचा आदेश तयार केला. ते दाखवून तो अचलपूर नगरपालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर खास ओळखपत्रही तयार करून घेतले होते.

अधिकाऱ्यांना फोन करून कामे वाजवली

ही कागदपत्रे हातात ठेवून मयूर ठाकरेने मुख्यमंत्री सचिवालयात जम बसविला. त्यातून नेते, बिल्डर, ठेकेदारांच्या फायली घेऊन त्या मार्गी लावू लागला. साऱ्या यंत्रणेदेखत हे घडूनही मयूर ठाकरेबाबत कोणाला, कधीच काडीचाही संशय आला नाही. त्याला कोण्या एका अधिकाऱ्याने कधी हटकले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे धाडस वाढले. राज्यभरातील ‘आयएस’ आणि ‘आयपीएस’अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून वाटेल ती कामेही करून घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातून मयूरने भौतिक प्रगती साधल्याचे बोलले जाते.
हे सुद्धा वाचा
पंतप्रधान मोदीचं रणवीर-दीपिकाकडून कौतुक!
शासन आपल्या दारी ? शेतकऱ्यांचा संसार सरणावरी…आठ महिन्यात मराठवाड्यात ६८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
तैमूर आणि जहांगीरला सांभाळणाऱ्या नॅनीला करीनाकडून मिळते अशी ‘वागणूक’

मात्र, सह्याद्री अतिथिगृहातील बैठकांमध्ये मयूरची धावपळ पाहून एका वरिष्ठ अधिकाऱ्याला संशय आला आणि त्यांनी मयूरकडे चौकशी केली. तिथे त्याने गडबडीत असल्याचा बहाणा करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र, अधिकाऱ्यांचा मयूरवरचा संशय बळावला आणि त्याची झाडाझडती घेतली. त्यात मयूरने सरकारी यंत्रणेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी