29 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमंत्रालयIAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

‘महाविकास आघाडी’ सरकारने त्यांच्या कार्यकाळात आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. आता भाजपप्रणीत एकनाथ शिंदे सरकारने त्यांना सोयीस्कर वाटत असलेल्या अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्या द्यायला सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknathshinde )यांनी काही IAS अधिकाऱ्यांच्या (IAS Officer) बदल्या केल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर ओमप्रकाश बकोरिया (Omprakash Bakoriya) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बकोरिया हे यापूर्वी क्रीडा आयुक्त म्हणून काम करीत होते. क्रीडा आयुक्त पदावर सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर अस्तीककुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. दर दहा – बारा दिवसांत न चुकता सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरेंच्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी केली ‘घोडचूक’, शरद पवार करणार सुधारणा !

Mantralaya News : बाळासाहेब पाटलांच्या खासगी सचिवांना जायचंय अतुल सावेंकडे !

‘महाविकास आघाडी’ सरकारने त्यांच्या कार्यकाळात आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. आता भाजपप्रणीत एकनाथ शिंदे सरकारने त्यांना सोयीस्कर वाटत असलेल्या अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्या द्यायला सुरूवात केली आहे.

ganpati bappa contest

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी