25 C
Mumbai
Saturday, March 16, 2024
Homeमंत्रालयउद्धव ठाकरेंच्या पुढे फायलींचा ढीग, फायलींना मंजुरी मिळत नसल्याने काँग्रेस – राष्ट्रवादीचे...

उद्धव ठाकरेंच्या पुढे फायलींचा ढीग, फायलींना मंजुरी मिळत नसल्याने काँग्रेस – राष्ट्रवादीचे मंत्री हवालदील

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ महामारीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कामे करण्यासाठी पैसा शिल्लक नाही. तरीही अनेक मंत्र्यांनी वेगवेगळी ‘कामे’ काढली आहेत. अशा कामांच्या फाईल्सचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ढीग लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले ( Uddhav Thakceray kept pending huge files ).

कामांच्या फाईल्स तयार करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समजते. परंतु मुख्यमंत्र्यांनी या फायलींवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संबंधित मंत्री हवालदील झाले आहेत. काहीजण तर मुख्यमंत्र्याविषयी खासगीमध्ये नाराजीही व्यक्त करू लागले आहेत ( NCP and Congress ministers upset on Uddhav Thackeray ).

Mahavikas Aghadi

हे सुद्धा वाचा

अमृता फडणवीसांना संतप्त पोलीस अधिकाऱ्याचे पत्र

Breaking : पोलिसांच्या बदल्यांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अशोक चव्हाणांच्या राज्यपाल भेटीने उलटसूलट चर्चा सुरू

Breaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

तिन्ही पक्षांत मानापमान नाट्य

‘महाविकास आघाडी’ सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये सतत काहीना काही कुरबुरी सुरू आहेत. लॉकडाऊन उठविण्याच्या मुद्द्यावरून खुद्द शरद पवार मुख्यमंत्र्यावर नाराज झाले होते ( Sharad Pawar was reluctant on Uddhav Thackeray ). मुंबईतील पोलिसांच्या बदल्यांवरून उद्धव ठाकरे हे अनिल देशमुखांवर नाराज झाले होते.

lay bhari

सरकारमध्ये आम्हाला विश्वासातच घेतले जात नाही म्हणून काँग्रेसचे नितीन राऊत नाराज झाले होते. पीडब्ल्यूडी खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला अंधारात ठेवून केल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. बाळासाहेब थोरात यांनीही काहीशी नाराजी व्यक्त केली होती. जाहिरातीमध्ये छायाचित्र वापरले जात नाही म्हणूनही काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली होती.

अधिकारी परस्पर निर्णय घेतात अशी नाराजी छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. वेळ  आली की नाराजी व्यक्त करायची आणि नंतर सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत हे जाहीर करायचे, असे सध्या या सरकारचे सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे  अजोय मेहता यांच्या  सल्ल्याने काम करतात यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये अजूनही नाराजी आहेच. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांच्या फाईल्स रखडण्यामागेही हेच कारण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. आपल्या मर्जीनुसार बदल्या व्हाव्यात यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आकाशपाताळ एक केले. पण उद्धव ठाकरे यांनी डाळ शिजू दिली नाही. त्यामुळेही काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी