26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमंत्रालयराज्याच्या मुख्य सचिव पदासाठी मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर यांची नावे चर्चेत

राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर यांची नावे चर्चेत

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या २८ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार कुठल्या आयएएस अधिकाऱ्याची वर्णी लागेल, याबाबत मंत्रालयात चर्चा सुरु झाली आहे. सेवाज्येष्ठतेचा विचार केल्यास सध्याच्या घडीला मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर आणि सुजाता सौनिक या तिघांपैकी कोणाची तरी मुख्य सचिव पदावर  वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या २८ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार कुठल्या आयएएस अधिकाऱ्याची वर्णी लागेल, याबाबत मंत्रालयात चर्चा सुरु झाली आहे. सेवाज्येष्ठतेचा विचार केल्यास सध्याच्या घडीला मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर आणि सुजाता सौनिक या तिघांपैकी कोणाची तरी मुख्य सचिव पदावर  वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या सुरू असलेले राजकीय वातावरण लक्षात घेता, मनुकुमार श्रीवास्तव यांना सेवानिवृतीनंतर मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी सरकारकडे मुदतवाढ मागितली नाही. त्याऐवजी त्यांनी पाच वर्ष मुदतीच्या सेवा आयुक्तपदासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची या पदासाठी निवड झाली. श्रीवास्तव यांच्या निवृत्तीनंतर २९ एप्रिलपासून राज्याचे मुख्य सचिव पद रिक्त होणार आहे.

मनूकुमार श्रीवास्तव यांची मुख्य सचिव पदावर सेवाज्येष्ठतेनुसार निवड झाली होती. त्यामुळे आता नवीन मुख्य सचिवांची निवड करताना देखील सेवाज्येष्ठतेला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. सेवाज्येष्ठतेचा विचार केल्यास सध्याच्या घडीला मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर आणि सुजाता सौनिक या तिघांपैकी कोणाची तरी मुख्य सचिव पदावर वर्णी लागू शकेल. मनोज सौनिक आणि सुजाता सौनिक नात्याने पतीपत्नी आहेत. या दोघांनीही अतिरिक्त मुख्य सचिव पदावर राहून विविध विभागांची प्रशासकीय जबाबदारी उत्तमपणे सांभाळली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार या दांपत्याचा अग्रक्रम असला तरीही दोघेही महाराष्ट्राबाहेरच्या कॅडरचे अधिकारी आहेत. त्यामुळे ही बाब त्यांना मुख्य सचिवपदी विराजमान होण्यास अडचणीची ठरू शकते.

हे सुध्दा वाचा :

बारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा ; ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक

राज्याच्या तिजोरीत खडखडाट; धनादेशांचे वितरण रोखले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सुट्टीवर; गावी जाऊन पूजा घालणार?

मुख्य सचिव पदासाठी स्पर्धेत असलेले तिसरे अधिकारी डॉ. नितीन करीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली अनेक वर्षे असलेल्या नगरविकास खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. मराठी भाषिक आणि उत्तम प्रशासक असलेले डॉ. नितीन करीर मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील अधिकारी मानले जातात. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, डॉ. नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागू शकेल, अशी मंत्रालयात चर्चा आहे. डॉ. नितीन करीर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विश्वासातील अधिकारी आहेत. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी फडणवीस यांच्याकडून डॉ. करीर यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता असून त्यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी