32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीय'आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले'

‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील बंडखोर आमदारांच्या बंडाची अनेक कारणे समोर आली आहेत. त्यांनी आपण पळून जाण्यास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना कारणीभूत ठरवले आहे. मात्र तेच या बंडाला कारणीभूत आहेत असे नाही. तर आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून ‘मलिदा‘ मिळाला नाही. हे देखील मुख्य कारण आहे. हा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

कोणत्याही खात्यातील अधिकाऱ्यांच्या आपल्या मनाप्रमाणे बदल्या करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जाते. हे आता सर्वांनाच माहिती झाले आहे. लाखो, करोडोंच्या संख्येत ही रक्कम असते. त्यामुळे आमदारांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात डबघाईला आले होते. गेल्या दोन वर्षांत अधिकाऱ्यांच्या बदल्या न झाल्यामुळे सुमारे 700 ते 800 हजार कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे आमदारांच्यात नाराजीचा सूर पहायला मिळत आहे.

या राजकीय अस्थिरतेला केवळ अर्थ कारणच जबाबदार आहे. हिंदूत्व, पक्षनिष्ठा वगैरे सर्व थापा आहेत. हे जनतेला कळून चुकले आहे. आमदारांचे हे अर्थकारण ठप्प होण्यास कोरोनाची लाट कारणीभूत ठरली. कारण गेल्या दोन वर्षांपासून राज्यात बदल्या रखडल्या होत्या. आता पुन्हा बदल्यांच्या माध्यमातून कमाई करण्याची संधी आमदारांना मिळणार होती. परंतु मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी बदल्यांचे सर्व अधिकार आणि फाईल आपल्याकडे घेतली. त्यामुळे या आमदारांच्या मनात खदखद वाढली. नंबर एक, दोन आणि तीन वर्गाच्या बदल्या मंत्री आणि राज्यमंत्री वाटून घेतात. बदल्यांची वेळ येते, त्यावेळेस मंत्री आणि त्यांच्या दलालांची रेलचेल असते. आता मात्र त्याची कमाई थांबली होती. पीडब्लुडी, जलसंपदा, महसूल, परिवहन मंत्रालयातील बदल्यांसाठी मोठी बोली लागते.

23 मे ला पीडब्लूडी मंत्रालयात घाईघाईने बदल्या करण्यात आल्या. परंतु त्या अधिकाऱ्यांच्या बोली लावून देखील बदल्या झाल्या नाहीत. त्यानंतर 27 मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सर्व बदल्या थांबवल्या. त्याचवेळी अनेक निष्ठावंतपणाचे बिरुद मिरवणारे मोठे नेते नाराज झाले. मात्र त्यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवली नाही. भाजपसोबत घरोबा करण्याची इच्छा असणारे एकनाथ शिंदे हे स्वतः 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तोडण्याची भाषा करत होते.

हे सुध्दा वाचा :

महाराष्ट्राला भिकेला लावू इच्छिणाऱ्या ‘खेकडा’फेम तानाजी सावंतांची ‘लफडी’ बाहेर येणार !

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त भव्य चित्रपट निर्मितीची घोषणा

शिंदे – भाजपाकडे राज्यपाल, तर महाविकास आघाडीकडे विधानसभाध्यक्ष !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी