27 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका, खंडणी व जमीन घोटाळ्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरेची...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका, खंडणी व जमीन घोटाळ्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरेची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश

टीम लय भारी

मुंबई : घोटाळेबाज व गुंड प्रवृत्तीचा भाजप आमदार जयकुमार गोरे याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच दणका दिला आहे (MLA Jayakumar Gore Police ordered to interrogate).

तब्बल १० कोटीची खंडणी मागणे व सरकारी जमीन हडपणे या आरोपाखाली त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिले आहेत.

श्रीरामांविषयी अभद्र बोलणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंना काँग्रेसने फटकारले

भाजप आमदार जयकुमार गोरेला पत्रकार तुषार खरात यांचे झणझणीत प्रत्युत्तर

काही महिन्यांपूर्वी तत्कालिन विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा जयकुमार गोरेच्या खंडणी प्रकरणावर कार्यवाही करण्याच्या सुचना जारी केल्या होत्या (Instructions were issued to take action on Jayakumar Gore ransom case).

त्या अनुषंगाने जयकुमार गोरे याच्यावर कारवाईचा फास आवळण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गोरे याच्यासह एकूण १४ जणांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

आमदार गोरे याच्यासह सुनील पोरे, जयसिंगराव जाधव, सागर अभंग, महेश पांडूरंग रेवणे, नारायण धोंडू रेवणे, विशाल बागल, बाबाजी उंबरकर, सचिन बेलोसे व सचिन पाडाळे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

जयकुमार गोरेने एका जमीन व्यावसायिकाकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. गोरे याने पनवेल व खारघर परिसरांत गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या आहेत. अन्य आरोपींच्या मदतीने गोरे याने हे कांड केले आहे.

लेकीचे गुण वाढविल्याने मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेल्या नेत्याची कहाणी

In BJP’s push for OBC outreach, its UP chief calls on Mulayam

या प्रकरणी सन २०१८ मध्येच जयकुमार गोरे याच्या विरोधात पोलिसांमध्ये प्रकरण दाखल झाले होते. पोलिसांना सकृतदर्शनी गोरे हा दोषी असल्याचे आढळून आले होते. पनवेल पोलिसांनी गोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी तत्कालिन पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडे मागितली होती. पण दुधे यांनी गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली नव्हती.

त्यावेळी हा जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होता. पण मनाने भाजपसोबत त्याची नाळ जोडली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्तामुळे त्यावेळी गोरे याच्यावर कारवाई झाली नाही (Due to the generosity of Devendra Fadnavis, no action was taken against Gore at that time).

MLA Jayakumar Gore Police ordered to interrogate
आमदार जयकुमार गोरेची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश

दरम्यानच्या काळात भाजपची सत्ता गेली, अन् ठाकरे सरकार सत्तेत आले. तक्रारदारांनी तत्कालिन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. या गंभीर प्रकरणाची दखल पटोले यांनी घेतली. नंतर मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली. त्यानुसार जयकुमार गोरे व अन्य १४ जणांची चौकशी सुरू झाली आहे. या १४ जणांना पोलिसांनी नुकतेच चौकशीसाठी बोलाविले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोरे व त्याच्या साथीदारांच्या विरोधातील भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे या सगळ्या आरोपींवर लवकरच मोठी कारवाई होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी