34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईमहागाईवर काहीतरी बोला अन्यथा पुढचा काळ कठीण आमदार  जितेंद्र आव्हाड यांचा मोदी...

महागाईवर काहीतरी बोला अन्यथा पुढचा काळ कठीण आमदार  जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

टीम लय भारी 

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी पत्रकार परिषद घेतं मोदी सरकारवर जोरादार टीका केली आहे.उपाशीपोटीच क्रांती घडते एवढं लक्षात घ्या त्यामुळे महागाई आवरती घ्या  महागाईवर काहीतरी बोला अन्यथा पुढचा काळ कठीण आहे.

मागच्या मार्चमध्ये महागाईचा दर ७.२ होता आता महागाईचा दर १४ वर पोचला आहे याचा अर्थ महागाई कधी नव्हे एवढी ७० वर्षात शिगेला पोचली आहे. ७० वर्षात कॉंग्रेसने म्हणजे आम्ही काय केले बोलणार्‍यांना आम्ही महागाई जागतिक बाजारात होती तेव्हा रोखून धरली होती आता जागतिक बाजारात महागाई नाहीय. पण आपल्या देशात आहे याची आठवणही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी करुन दिली आहे.

देशातील पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव कुठे पोचले आहेत हे एखाद्या गृहिणीला विचारा, गाडी वापरणाऱ्या मध्यमवर्गीयाला विचारा म्हणजे समजेलं.  एकंदरीतच महागाई सर्वसामान्यांना भाजून काढत आहे. उन्हाचा चटका कमी तर महागाईचा चटका जास्त बसतोय मात्र आपण फक्त मिडिया, पेपरमध्ये, राजकीय चर्चेतसुध्दा काय पहातो आहे तर फक्त नको त्या विषयांना विषय बनवले जात आहे.

एकंदरीतच महागाई कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हे केले जात आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हटलं आहे. धर्म ही अफूची गोळी आहे ती खाल्ली की लोकं सगळं विसरतात हे कार्ल मार्क्स यांचे उदाहरणही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिले आहे.

हे सुध्दा वाचा:

घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही – जितेंद्र आव्हाड

Indira Gandhi`s attempt to strangulate democracy was defeated by students, history will be repeated: NCP leader Jitendra Awhad

भोंगे लाऊडस्पीकर लावताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी : दिलीप वळसे पाटील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी