33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्ररामनवमी उत्सवाचे औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं

रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं

टीम लय भारी 

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले. आज थेट मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केली आहे. आमच्या या कृतीमुळे शिवसेनेचे हिंदुत्व जागं होईल, असं  मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी  मनसे नेते यशवंत किल्लेदार आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.(Mns bhonga at shiv sena bhavan)

या सगळ्या प्रकरणावर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. देशपांडे म्हणतात की, शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे.  मग कारवाई का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे मात्र आमच्यावर अशा प्रकारे कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हे सुध्दा वाचा:

कोमेजलेले राज ठाकरे !

Ajit Pawar vs Raj Thackeray On Loudspeakers With ‘Hanuman Chalisa’ At Mosques

सिल्वरओक ला भेट घेतल्यानंतरची संजय राऊतांची यांची प्रतिक्रिया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी