28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयमनसेचे राजेश टोपेंना आव्हान; मोफत उपचार घेतलेले रूग्ण दाखवा, नाहीतर राजीनामा द्या

मनसेचे राजेश टोपेंना आव्हान; मोफत उपचार घेतलेले रूग्ण दाखवा, नाहीतर राजीनामा द्या

टीम लय भारी

मुंबई : ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’अंतर्गत  १ लाख २२ हजार ‘कोरोना’ रूग्णांवर मोफत उपचार केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. पण ही माहिती खोटी असल्याचा पर्दापाश ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने ( MNS fired to Rajesh Tope ) केला आहे.

याबाबत मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी राजेश टोपे यांना आव्हानच दिले आहे ( MNS New Mumbai chief Gajanan Kale challenged to Rajesh Tope ) . महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार घेतलेल्या १.२० लाख कोरोना रूग्णांचे पुरावे जाहीर करा, अन्यथा राजीनामा द्या अशी मागणी काळे यांनी केली आहे.

Mahavikas Aghadi

राज्यात सध्या १.६४ लाख कोरोनाचे रूग्ण आहेत. त्यापैकी १.२२ रूग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केल्याचा दावा चटकन खोटारडा असल्याचे लक्षात येते. मुळातच या योजनेतून सरसकट सगळ्या ‘कोरोना’बाधितांवर मोफत उपचार केले जात नाहीत. जे ‘कोरोना’ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांचाच या योजनेत समावेश केला जातो ( MNS clams that, Mahatama Jyotiba Fule scheme only for ventilator patient ).

हे सुद्धा वाचा

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपे यांचा मोठा निर्णय, जगात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला मिळणार ‘ही’ सुविधा

Coronavirus : उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू

Health Minister Rajesh Tope : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ट्विट; रेमडेसिविरचे 10 हजार इंजेक्शन खरेदी करणार

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला तर तिथे ही योजना केवळ व्हेंटिलेटरवरील रूग्णांसाठी असल्याचे सांगितले जाते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांची संख्या एक किंवा दोन टक्के असू शकते. शेकडो रूग्णांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधला होता. परंतु त्यांना या योजनेतून लाभ मिळालेला नाही.

एका बाजूला इच्छूक रूग्णांना या योजनेतून मोफत उपचार दिले जात नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला खोटा दावा केला जातो. हा प्रकार संतापजनक आहे. राजेश टोपे यांनी जनतेला उल्लू बनविले आहे. त्यामुळे टोपे यांनी राज्यातील जनतेची माफी मागून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काळे यांनी केली आहे ( MNS challenged to Rajesh Tope ).

Laybhari appeal

याबाबत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे ( Sudhakar Shinde ) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, १.२२ लाख रूग्णांचा आकडा हा महात्मा फुले जन आरोग्य योजना व सरकारी, महापालिका इस्पितळांतील आहेत. सरकारने विविध इस्पितळांतून मोफत उपचार दिलेल्या संख्येचा हा आकडा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी