महाराष्ट्रराजकीय

मनसेच्या नेत्याने विलासराव देशमुखांबद्दलची सांगितली जुनी आठवण

राजकारणातील राजहंस अशी ओळख असणाऱ्या दिवंगत विलासराव देशमुख यांची आज ७७ वी जयंती आहे. त्यानिमित्त अनेकांना विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्यातच मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS leader Gajanan Kale)  यांनी विलासराव देशमुखांबद्दलची एक जुनी आठवण सांगितलेय.

टीम लय भारी

नवी मुंबई : राजकारणातील राजहंस अशी ओळख असणाऱ्या दिवंगत विलासराव देशमुख यांची आज ७७ वी जयंती आहे. त्यानिमित्त अनेकांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्यातच मनसेचे (MNS) प्रवक्ते गजानन काळे यांनी विलासराव देशमुखांबद्दलची एक जुनी आठवण सांगितलेय. (MNS leader Gajanan Kale shared old memories about Vilasrao Deshmukh)

मनसेच्या नेत्याने विलासराव देशमुखांबद्दलची सांगितली जुनी आठवण

विलासराव देशमुख..खरे मुख्यमंत्री, विद्यार्थी चळवळीत असताना मागासवर्गीय मुलांच्या वरळी हॉस्टेल मध्ये सोयी सुविधा मिळत नव्हत्या म्हणून आम्ही रात्री १२ वाजता सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन हॉस्टेल बाहेर आंदोलनांना बसलो आणि रात्री १ वाजता हिम्मत करून मी मुख्यमंत्री विलासरावांना कॉल केला, असा विलासराव देशमुखांबाबतचा आठवणीतला किस्सा गजानन काळे यांनी टविट् करत सांगितलाय.

इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासरावांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे लातूर आणि ग्रामीण भागातील अनेक मंडळी विलासराव देशमुख यांना थेट संवाद साधायचे. त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से आजही जनतेच्या आठवणीत आहेत.

विलासरावांबद्दलचं लोकांच्या मनात असणारं हे प्रेम पाहून त्यांचा हा मोबाईल नंबर आजही सुरु ठेवण्यात आलाय. विलासराव यांचा ९८२११२५००० हा मोबाईल नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. फोन लावल्यानंतर त्यांची गाजलेली भाषणे ऐकायला मिळतात.


हे सुद्धा वाचा :

दिवंगत विलासराव देशमुख यांना फोन करा, आजही ते लगेच फोन घेतात

Video : मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

मनसेकडून संदीप देशपांडे, गजानन काळे, अविनाश जाधव यांच्यासह 27 जणांची उमेदवारी जाहीर

मनसेचे राजेश टोपेंना आव्हान; मोफत उपचार घेतलेले रूग्ण दाखवा, नाहीतर राजीनामा द्या

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close