28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमोदी – शाहांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘गेम’ केला

मोदी – शाहांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘गेम’ केला

टीम लय भारी

मुंबई : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मोठे झाले तर भविष्यात ते पंतप्रधान होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये कोलदांडा घालण्यासाठी अमित शाह प्रयत्न करतात, अशी गेल्या काही अडीच वर्षांपासून वदंता होती. ती खरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा एक गट फोडून सुरतमार्गे गुवाहाटीला पलायन केले होते. त्याच वेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री पदासाठी बार्गेनिंग सुरू केले होते. त्याबाबतची बातमी ‘लय भारी’ने यापूर्वीच दिली होती. ती तंतोतंत खरी ठरली आहे.

गेल्या आठ – दहा वर्षांत राज्यात भाजपचा प्रसार होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळायला हवे होते. परंतु अमित शाह यांनी त्यांच्या पायात कोलदांडा घातला. नरेंद्र मोदींकडे अमित शाह यांची किंमत मोठी आहे. त्यामुळे शाह यांचे ऐकून नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना पद्धतशीर बाजूला ठेवल्याच्या चर्चेला आता तोंड फुटले आहे.

EXCLUSIVE : एकनाथ शिंदेंची भूक वाढली, भाजपकडे केली मुख्यमंत्रीपदाची मागणी

महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणतानाच देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्यासारखा ‘सांगकाम्या’ मुख्यमंत्री खूर्चीत बसविला. शिवसेनेला दुबळे केले. अन् मुंबई, ठाणे व नवी मुंबई या प्रमुख महानगरपालिकांमध्ये भाजपचे सरकार आणण्यासाठी खेळी केली. अशा एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम मोदी – शाह यांनी केले आहे.

भाजपप्रणीत नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठलेही संवैधानिक पद नसल्याने फडणवीस यांचे महत्व सुद्धा कमी होईल. किंबहूना मंत्रीमंडळात असलेल्या संभाव्य मंत्र्यांपैकी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार असे नेत्यांना अधिक बळ मिळेल, असेही सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :

‘लय भारी’चे भाकीत ठरले खरे, एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सात दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली होती बातमी

फडणवीस सरकार नाही तर, शिंदे सरकार

पंकजा मुंडे मंत्रिपदापासून वंचित

भाजप आमदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; उच्च न्यायालयाने नाकारला आहे जामीन, तरीही मंत्रीपदासाठी लॉबिंग !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी