30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरसिनेमाDia Mirza Niece : अभिनेत्री दिया मिर्झाच्या कुटुंबातील लाडक्या व्यक्तीचे झाले निधन

Dia Mirza Niece : अभिनेत्री दिया मिर्झाच्या कुटुंबातील लाडक्या व्यक्तीचे झाले निधन

नुकतेच दिया मिर्झाच्या एका जवळच्या व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. याबाबतची पोस्ट दियाकडून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. दियाची भाची तान्या काकडे हिने रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा (Actress Dia Mirza) ही चित्रपट सृष्टीत फारशी कार्यरत नसली तरी तिचे आजही लाखो चाहते आहेत. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. दिया आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे सुद्धा पोस्ट शेअर करत असते. नुकतेच दियाच्या एका जवळच्या व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. याबाबतची पोस्ट दियाकडून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. दियाची भाची तान्या काकडे हिने रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. ज्यामुळे दियाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तान्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर दियाने तिच्यासाठी भावनिक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.

दियाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तान्याचा मृत्यू कसा झाला हे सांगितले नसले तरी, मिळालेल्या माहितीनुसार, तान्या ही तिच्या मित्रांसोबत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हैदराबादला जात होती. याचवेळी तिची कार दुभाजकावर आदळली. यामध्ये कारमधील सर्वच जण जखमी झाले. पण तान्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर तिचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आला आणि या दुर्दैवी घर्टनेची माहिती दिया मिर्जा हिच्या कुटुंबियांना कळविण्यात आली. तर तान्याच्या जखमी मित्रांना विमानतळ पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

दियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला तान्याचा फोटो पोस्ट करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘माझी भाची, माझा जीव की प्राण, माझी मुलगी आता या जगात नाही. तू जिथे कुठे असशील तिथे तुला नेहमी शांती आणि प्रेम मिळो. तू सदैव माझ्या हृदयात राहशील. ओम शांती.’ तिच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसने कमेंट करत तान्याला आदरांजली वाहिली आहे. तर तिच्या या पोस्टवर सर्वसामान्य नेटकऱ्यांनीही आदरांजलीच्या कमेंट केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा 

VIDEO : बिग बॉस मराठीचे ४ थे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!