33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeसिनेमा'मी पुन्हा येईन' या मराठी वेब सीरिजच्या टीझरवर भडकले बाबासाहेब पाटील

‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजच्या टीझरवर भडकले बाबासाहेब पाटील

टीम लय भारी

मुंबईः चित्रपट हे मनोरंजनापेक्षा भारताच्या राजकारणात सत्तांतर करण्याच्या अधिक उपयोगी येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. बाबासाहेब पाटील यांनी हिंदी, मराठी चित्रपट आणि वेब सीरिजच्या कथानकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यात कंगना रनौतचा आगामी चित्रपट  ‘ईमरजन्सी’  प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ आणि ‘प्लॅनेट’ मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणारी ‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजचा समावेश आहे. कंगनाचा  ‘इमर्जन्सी’  हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ नये अशीही मागणी त्यांनी केली आहे.

उरी, मिशन मंगल, पॅडमॅ, मोदी, काश्मीर फाइल्स, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, ताश्कंद  यांच्या माध्यमातून भाजपने खूप मोठ्या प्रमाणात स्वतःच्या पक्षाच ब्रॅण्डिंग आणि काँग्रेसच्या बद्दल आणि विविध राजकीय जुन्या नेत्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात असे चित्रपट आम्ही महाराष्ट्रात रिलीज होऊ देणार नाही.

‘मी पुन्हा येईन’ या वेब सीरिजच्या टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत. हे पहायला मिळालं. राजकारणावर आधारित या वेब सीरिजमध्ये कपट, कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी असा सगळा मसाला पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.

चित्रपट किंवा सीरिज निर्मितीकरता किमान काही महिन्यांचा अवधी लागतो. मात्र मी “पुन्हा येईन” ही सीरिज जर महाराष्ट्रात घडलेल्या घटनाक्रमावर आधारित असेल, तर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होताच 20 दिवसांत सीरिज कशी तयार होऊ शकते. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याची पूर्वकल्पना जर ‘मी पुन्हा येईल’च्या निर्माता दिग्दर्शकाला आधीच होती. तर यावरून महाराष्ट्रातले शिवसेनेसह इतर विरोधी राजकीय पक्ष किती गाफील आहेत. हे यावरून सिद्ध होते.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची निर्मिती असलेला कर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट निर्मितीनंतर त्यात वापरल्या गेलेल्या घटनाक्रमाचा वापर करून काही दिवसातच एकनाथ शिंदे शिवसेनेतून वेगळे होऊन बंडखोरी करतात.भारताच्या राजकारणात चित्रपटाचे महत्त्व मनोरंजनापेक्षा सत्तांतर करण्याच्या उपयोगी येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात सत्ता पलटण्याच्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट काही महिन्यापूर्वीच लिहिल्या गेल्याचे उदाहरण म्हणजे नुकताच येऊ घातलेला मराठी चित्रपट’ ‘मी पुन्हा येईन’ प्रदर्शनाच्या वाटेवरती आहे.

हे सुध्दा वाचा:

सर्वांत धक्कादायक ! मोदी सरकारच्या काळात 4 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व

शरद पवारांच्या उपस्थितीत ‘मार्गारेट अल्वा’ यांनी भरला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज

‘या‘ माफियांना कोणाचा आशिर्वाद ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी