टीम लय भारी
मुंबईमधील वरळीतील ब्लू सीज या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे सर्वाजनिक बांधकाम, नगरविकासमंत्री मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता प्रसाद ओकला धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशात पाहता भावुक होऊन पाया पडले. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmveer Mukkam Post Thane) या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चचं कार्यक्रमात हा प्रकार घडला. Dharmveer Mukkam Post Thane -Eknath Shide grabbed actor Prasad Oak’s legs
वंदनीय #गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे #साहेब यांची जीवनगाथा मांडणाऱ्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. #Dharmaveer #MusicLaunch pic.twitter.com/GwPpdzsHL8
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 22, 2022
सध्या सर्वत्र शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित सिनेमाची चर्चा रंगत आहे. (Dharmveer Mukkam Post Thane) सिनेमात त्यांची व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. सध्या प्रसाद ओकच्या या लुकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एवढंच नाही, तर शिवसैनिकांना देखील आनंद दिघे यांनाच समोर पाहत आहोत, असा भास होत आहे. सोहळ्या दरम्यान प्रसाद ओकला आनंद दिघे यांच्या रुपात पाहून एकनाथ शिंदे देखील भावुक झाले.
View this post on Instagram
आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यातील जिव्हाळा सांगणारा हा प्रसंग पाहून अनेकांचे (Dharmveer Mukkam Post Thane) डोळे पाणावले. त्याच बरोबर शिवसैनिक देखील भावुक झाले तर, या क्षणाची चर्चा सिनेसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदेंच्या राजकीय यशात आनंद दिघेंचं मोठं योगदान आहे, हे एकनाथ शिंदे कधीही विसरत नाहीत. कालच्या प्रसंगावरुन ते पुन्हा स्पष्ट झाले.