वेस्ट इंडिजचा जगप्रसिद्ध क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स आणि भारतीय अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता ही नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. (Neena Gupta Vivian Richards Daughter Masaba Gupta Marriage) तिचे मिश्र कुटुंब आपण पाहिलेय का? स्वत: मिसाबाने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या कुटुंबाची माहिती दिलीय. तिचे संपूर्ण कुटुंब पहिल्यांदाच एकत्र आल्याने ती जाम खुश आहे.
मसाबा गुप्ता ही लोकप्रिय अभिनेत्री असून नामांकित फॅशन डिझायनरसुद्धा आहे. अभिनेता सत्यदीप मिश्राशी ती शुक्रवारी, 27 जानेवारी रोजी एका घरगुती समारंभात विवाहबद्ध झाली. या समारंभात मसाबाचे वडील व्हिव्हियन रिचर्ड्स, सावत्र वडील विवेक मेहरा, आई नीना गुप्ता आणि सत्यदीपची आई नलिनी मिश्रा तयबजी, बहीण चिन्मय मिश्रा यांच्यासह कुटुंबातील निवडक सदस्य उपस्थित होते.
View this post on Instagram
मसाबा गुप्ताने सत्यदीप मिश्रासोबत नेटफ्लिक्सवरील मसाबा मसाबा या चरित्रात्मक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तर अभिनय कारकीर्द सुरू करण्यासाठी मुंबईत येण्यापूर्वी सत्यदीप मिश्राने वकील म्हणून काम केले. बॉम्बे वेल्वेट, नो वन किल्ड जेसिका, फोबिया आणि विक्रम वेधा यांसारख्या चित्रपटांमध्ये तो प्रमुख भूमिकांमध्ये दिसला आहे. मसाबा मसाबा व्यतिरिक्त, सत्यदीप बेकायदेशीर, तनाव आणि नक्षलबारी सारख्या इतर वेब शोमध्ये देखील तो दिसला आहे.
संबंधित व्हिडिओ : नीना गुप्ताची मुलगी मसाबा गुप्ता हिने सत्यदीप मिश्राशी लग्न केले. त्यानंतर अथिया शेट्टी, अनन्या पांडे आणि इतर कलाकार मित्रांनी नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले. (व्हिडिओ क्रेडिट : टाइम्स ऑफ इंडिया)
हे सुद्धा वाचा :
बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती झाल्या वर्ल्डफेमस!
KBC 14 : केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चनने सांगितला पाणीपुरीचा किस्सा
मसाबाने काल सत्यदीपसोबतचे दोन फोटो शेअर करून लग्नाची बातमी दिली होती. शुक्रवारी तिने इंस्टाग्रामवर संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला. त्यांची कॅप्शन आहे – “संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच माझे सर्व कुटुंब एकत्र आले. हे आम्ही आहोत. माझे सुंदर मिश्रित कुटुंब (Blended Family). माझ्यासाठी इथून पुढे सर्व काही फक्त बोनस आहे.” कौटुंबिक फोटोसोबतच तिने वडील आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. तत्पूर्वी सकाळी तिने सत्यदीपसोबत लग्नाचे फोटो शेयर केले. त्यात लिहिले, “आज सकाळी माझ्या शांतीच्या महासागराशी लग्न केले. आता जीवनात प्रेम, शांतता, स्थिरता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्य हलकं-फुलकं असेल. फोटोसाठी मला कॅप्शन निवडू दिल्याबद्दल धन्यवाद. आता आयुष्य लय भारी होईल.”