28 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरसिनेमाऐश्वर्या रायला नोटीस

ऐश्वर्या रायला नोटीस

बॉलीवूडची अभनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय (Aishwarya Ray) हिला करचुकवेगिरी प्रकरणात नोटीस बाजवण्यात आली आहे. नाशिकमधील सिन्नर येथे ऐश्वर्या रायच्या मालकीची एक हेक्टर जमीन आहे. या जमिनीचा २१ हजार ९६० रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी ऐश्वर्याला तहसीलदारांनी (Revenue department ) ही नोटीस बजावली आहे. तहसीलदार एकनाथ सांगळे यांनी ऐश्वर्या रायला नोटीस पाठवली आहे. तसेच पुढील दहा दिवसांच्या आत कर न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील देण्यात आला आहे. गडगंज संपत्तीची मालकीण असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यासारखे प्रसिद्ध व्यक्ती क्षुल्लक रकमेचा कर भरण्यासही टाळाटाळ करतात हे ऐकून नवल वाटत आहे. (Notice issued to Aishwaryaa Ray for tax evasion)

हे सुद्धा वाचा

दाऊद इब्राहिम सापडला…

VIDEO : पक्षी v आकाराच्या थव्याने का उडतात ?

शिंदे सरकारने महाराष्ट्रासाठी आणली ४५ हजार कोटींची गुंतवणूक

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणेगावजवळ अडवाडी येथे ऐश्वर्या राय-बच्चन यांची जमीन आहे. या ठिकाणी डोंगराळ ठिकाणी असलेल्या याच जमीनीच्या एक वर्षाच्या कराचे २२ हजार रुपये थकल्याने तहसीलदारांनी ही नोटीस पाठविली आहे. करचुकवेगिरी प्रकरणात अन्य १२०० मालमत्ताधारकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

२०२२- २३ या वर्षाचा २१ हजार ९६० आणि नोटीशीचा दहा रुपये खर्च असा एकूण २१,९७० रुपयांचा कर शिल्लक असल्याचे या नोटीशीत नमूद केले आहे. ९ जानेवारी, २०२३ रोजी महसूल विभागाने ही नोटीस काढली आहे. मार्च महिनाअखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून करबुडव्यांकडून कारवाई करण्यात येते. त्याच कारवाईचा भाग म्हणून ऐश्वर्या राय बच्चन यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

करचुकवेगिरीत समावेश असलेल्या अन्य कंपन्या
आयटीसी मराठा लिमिटेड, हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेड, ओपी इंटरप्रायझेस कंपनी गुजरात, बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड, मेटाकोन इंडिया प्रा. लि., कुकरेजा डेव्हलोपमेंट कोर्पोरेशन, रामा हॅंडीक्राफ्ट, बलवीर रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, छोटाभाई जेठाभाई पटेल आणि कंपनी.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी