ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा पद्मभूषणने सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांनी पद्मभूषण सन्मान स्वीकारला. (PadmaBhushan Suman Kalyanpur)
सुमन कल्याणपूर यांची मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली. नुकताच त्यांना पुलस्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सुमन कल्याणपूर यांनी हिंदी, मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत.
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा पद्मभूषणने सन्मान
PadmaBhushan Suman Kalyanpur
Live #पद्मपुरस्कार वितरण सोहळा लाईव्ह #PadmaAwards2023 https://t.co/VyKfKem6sO via @YouTube— Lay Bhari Media (@laybharinews) March 23, 2023
अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भावनिपूर येथे 28 जानेवारी 1937 रोजी झाला. सुमन कल्याणपूर यांचे माहेरचे आडनाव होते हेमाडी. लग्नापूर्वी ती सुमन हेमाडी नावानेच गात असे. घरातील वातावरण एकदम कलासक्त/रसिक आणि धार्मिक असल्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते.

लहानपणी त्या खूप छान चित्र काढायच्या. पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी जे. जे. स्कूलमध्ये काही काळ चित्रकलेचे धडे गिरवले. घरात रेडीओ अव्याहतपणे चालू असायचा. सैगल, नूरजहान, खुर्शीद, सुरैया यांच्या अप्रतिम गाण्यांनी धुंद झालेला तो काळ होता. त्या सदैव गाणी गुणगुणायच्या. नाटककार मो. ग. रांगणेकर, केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे या कलावंत मंडळीची त्यांच्या घरी उठबस होती.
सुमन कल्याणपूर यांचा संगीत शिक्षणाची सुरुवात यशवंत देव यांच्याकडे झाली. त्यांनीच पहिल्यांदा चित्रपटकरीता गाण्याची संधीही दिली. हा सिनेमा दुर्दैवाने प्रदर्शित झालाच नाही. पण या गाण्याच्या ध्वनी मुद्रणाच्या वेळी हिंदी चित्रपटाचे संगीतकार महंमद शफी तिथे हजर होते. त्यांना सुमन कल्याणपूर यांचा आवाज आवडला व लगेच त्यानी त्यांच्या ‘मंगू’ सिनेमाकरीता त्यांना साईन केले. “कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे” सुमन कल्याणपूर यांचे रूपेरी पडद्यावरच पाहिले गाणे.