33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeसिनेमाHemant Dhome: लोकांनी चित्रपटाची तिकीटे काढली, मात्र शो कॅन्सल झाला; मराठमोळ्या दिग्दर्शकाची...

Hemant Dhome: लोकांनी चित्रपटाची तिकीटे काढली, मात्र शो कॅन्सल झाला; मराठमोळ्या दिग्दर्शकाची खंत

प्रेक्षकांना सिनेमा पाहण्यास रोखलं जात असल्याचं निदर्शनास आले. मराठी सिनेमांचे शो रद्द केले जात आहेत. याबाबत हेमंत ढोमेने ट्विट करत खंत व्यक्त केली.

कोविड 19 नंतर सिनेसृष्टी पुन्हा कार्यात रुजू झाली आहे. मराठी सिनेमाही यात मागे नाही. नेहमीच वेगळे आणि मनोरंजक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाही अशा चर्चा नेहमीच होताना दिसतात. दरम्यान मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून ओळखला जाणारा हेमंत ढोमे सोशल मीडियावर बराच कार्यक्षम असतो. हेमंत ढोमे हा ‘सनी’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपट नुकताच रिलीज असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असूनही, प्रेक्षकांना सिनेमा पाहण्यास रोखलं जात असल्याचं निदर्शनास आले. मराठी सिनेमांचे शो रद्द केले जात आहेत. याबाबत हेमंत ढोमेने ट्विट करत खंत व्यक्त केली.

 

हेमंत ढोमेच्या नुकत्याच रिलिज झालेल्या सनी चित्रपटासाठी काही प्रेक्षकांनी तिकिट काढले मात्र शो कॅन्सल झाला. हा प्रकार घडल्यानंतर हेमंत ट्विट करत म्हणाला, प्रेक्षकांना संदेश पाठवून कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत.
यासोबतच त्या ट्विट मध्ये तो म्हणाला, ”हिंदी सिनेमा चालतोय त्याला आमची काहीच हरकत नाही उलट मनापासुन शुभेच्छा आहेत आणि आनंद देखील आहे. कारण संपुर्ण चित्रपटसृष्टी साठी ती एक सकारात्मक गोष्ट आहे, पण यात आपल्याच महाराष्ट्रात आपला मराठी सिनेमा बाजुला पडतोय. पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शो कॅन्सल केले जात आहेत! मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच!”

हे सुध्दा वाचा

Kokan Festival : मुलुंडमध्ये बुधवारपासून अस्सल कोकणी संस्कृतीचा ‘कोकण महोत्सव’

VIDEO : महाराष्ट्रातील प्रत्येकाने ‘या’ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे !

Devendra Fadanvis : शेती पंपांच्या वीज जोडण्या कापू नका!; फडणवीसांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा

दरम्यान, सनी या सिनेमात घरापासून दूर राहिलेल्या व्यक्तींची कहाणी दाखवण्यात आली आहे. ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या चित्रपटाच्या प्रोमोलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दर्शवला होता. मात्र आता या चित्रपटासाठी स्क्रीन मिळणं अवघड झाल्याचं पहायला मिळतंय.
मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नसल्याने यापूर्वीही अनेक सिनेमांना फटका बसला आहे. आताही दृश्यम सिनेमामुळे गोदावरी सिनेमाला कमी स्क्रीन मिळत आहे. त्याबाबतच हेमंत ढोमेच्या ट्विट वरून अनेकांनी सहमती दर्शवत मराठी सिनेमांबाबत थिएटर्स धोरण बदल्याची गरज आहे. असे मत व्यक्त केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी