सोमवारी कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती. रजत बेदीनेच त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले आणि मदत करण्याचे आश्वासनही दिले, अशी माहिती जखमी व्यक्तीच्या कुटुंबाने दिली आहे. जखमी राजेश रामसिंग दूत यांची प्रकृती गंभीर आहे.
अरूणिता कांजीलाल व पवनदीप राजन यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल…
‘इंडियन आयडॉल 12’ च्या ट्रॉफीवर पवनदीपने मारली बाजी
डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी सांगितले, की अभिनेता रजत बेदीविरोधात आयपीसी कलम २७९ आणि ३३८, तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कुर्डे म्हणाले की, कार स्वतः रजत बेदी चालवत होता. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला रजतच्या गाडीने उडवले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही (No arrests have been made yet).
‘बालिका वधू’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन
पादचाऱ्याच्या डोक्याला दुखापत
जखमी राजेश रामसिंग दूत यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले, “त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, कारण त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ते आयसीयूमध्ये असून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांना तातडीने रक्ताची गरज आहे.”
राजेशची पत्नी बबिता दुत म्हणाली, “माझे पती कामावरून परतत असताना संध्याकाळी ६.३० वाजता अंधेरी वेस्ट लिंक रोडवर शीतला देवी मंदिराजवळ ही घटना घडली. अभिनेता रजत बेदी एमएच ०२ सीडी ४८०९ ही आपली कार चालवत होता, त्याने माझ्या पतीला रस्ता ओलांडत असताना धडक दिली. तो खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. माझ्या पतीला काही झाल्यास रजत बेदी जबाबदार असेल, त्याला अटक करा अशी मागणी बबिता यांनी केली आहे.
पोलीस हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत रजत बेदी निघून गेला होता, त्यानंतर तो परतला नाही. डीएन नगर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले आहे (DN Nagar police have summoned him for questioning).
कोण आहे रजत बेदी?
अभिनेता रजत बेदीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. इंटरनॅशनल खिलाडी, जोडी नंबर वन, जानी दुश्मन, कोई मिल गया, अक्सर, पार्टनर यासारख्या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…