29 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरसिनेमाराखी सावंतला अटक; वाचा काय आहे नेमके प्रकरण

राखी सावंतला अटक; वाचा काय आहे नेमके प्रकरण

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या लग्नाच्या जोरदार चर्चा देखील सोशल मीडियावर नुकत्याच सुरु होत्या. आता मात्र राखी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राखी सावंतला ताब्यात (arreste) घेतले आहे. राखीने एका महिला मॉडेलचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणात सत्र न्यायालयाने तिचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी आज तिला ताब्यात घेतले आहे. (Rakhi Sawant was arrested by the Mumbai Police)

एका मॉडेलचे फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर आहे. महिला मॉ़डेलने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबईतील आंबोली पोलिसांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये राखी सावंतवर आयटी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राखीने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र आता न्यायालयाने राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी राखी सावंतला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने ट्विट करत राखी सावंतला अंबोली पोलिसांनी अटक केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी राखी सावंतवर भादवी 883/2022 अंतर्गत अटक केल्याचे म्हटले आहे. पुढे तिने म्हटले आहे की, राखी सावंतची ABA 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी