27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरसिनेमासांगलीच्या चाहत्यांची कमाल; 'पठाण'साठी केले अख्खे थिएटर बुक

सांगलीच्या चाहत्यांची कमाल; ‘पठाण’साठी केले अख्खे थिएटर बुक

नाद करावा आणि शेवट करावा तो सांगलीकरांनीच!शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण चित्रपटाचे (Pathaan) तिकीट बुकिंग सुरू झाल्यापासून लोकांचा त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मग आपली सांगली (Sangli) तर त्यात कशी मागे राहील! शाहरुखचा पठाण चित्रपट पाहण्यासाठी सांगलीतल्या एका फॅन क्लबने कमालच केली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी या क्लबने अख्खे थिएटरच बुक केले आहे. या फॅन्सची कमाल पाहून शाहरुखने देखील या चाहत्यांचे खास शब्दांत आभार मानले आहेत. (Sangli’s brother did a great job! The entire theater was booked for Pathan)

गेल्या 3-4 महिन्यांपूर्वी वादाच्या कचाट्यात अडकलेला पठाण चित्रपट प्रदर्शनापूर्वीच तिकीटबारीवर चांगलीच मुसंडी मारतोय. ऑक्टोबर 2022 मध्ये पठाण चित्रपटाचा पहिला ट्रेलर रीलीज झाला होता. पण चित्रपटातील दीपिका पादुकोनच्या ड्रेसिंगमुळे चित्रपट चांगलाच वादामध्ये सापडला होता.

खूप साऱ्या लोकांकडून चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली जात होती. पण आता प्रत्यक्षात चित्रपटाची बुकिंग सुरू झाल्यापसून लोकांकडून मात्र चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी 20 जानेवारीला चित्रपटाची ऑनलाइन बुकिंग सुरू झाली आणि 24 तासातच चित्रपटाने 14 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. त्यातील सर्वात जास्त कमाई ही हिंदी आणि तेलगू भाषिक टिकीटांमधून झाली होती. त्यात आता सांगलीच्या एका पठ्ठ्याने तर कहरच केलाय. थेट आख्खे  थिएटरच ह्या चाहत्याने बुक केल आहे.

हे सुद्धा वाचा 

नायब तहसीलदार महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

VIDEO : मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या या पत्रकाराचे काम पाहा 

गोडसेला सुद्धा ब्लॉक करणार का?

शाहरुख खानचे चाहते हे नेहमीच त्याचे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात गेल्या काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने तर जर चित्रपट प्रदर्शित नाही केला, तर मी जीव देईल,अशी धमकीच दिली होती. आता एका फॅन क्लबने तर फर्स्ट डे फर्स्ट शो ची तब्बल 110 तिकीट बुक केली आहेत. तिकीट बुक करून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी शाहरुख खानला टॅग केल आहे. आपल्या ट्वीटमध्ये या चाहत्यांनी म्हटले आहे की ”सर प्लीज बघा, आम्ही तुमच्यासाठी पूर्ण थिएटर बुक केल आहे. संपूर्ण जग तुमचा हा पठाण चित्रपट पाहण्यासाठी तयार आहे”.

चाहत्याच्या त्या ट्वीटला रिट्वीट करत स्वतः शाहरुख खानने त्याचे आभार मानले आहेत. संपूर्ण जगभरात पठाण पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच खूप सारे रेकॉर्ड मोडले आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला आता तुफान प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी