28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeसिनेमा'पठाण'ला देशविदेशातून तुफान प्रतिसाद; शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटर्स डोक्यावर घेतली

‘पठाण’ला देशविदेशातून तुफान प्रतिसाद; शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटर्स डोक्यावर घेतली

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला. बॉयक़ॉटच्या ट्रेंडनंतर देखील पठाण चित्रपटाला आज उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (Shah Rukh Khan’s Movie Pathaan has received huge response worldwide) बॉलिवूडला गेल्या काही दिवसांपासून आलेली मरगळ झटकून काढेल अशी तुफान गर्दी चित्रपटगृहांमध्ये आज पहायला मिळत आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी अक्षरश: चित्रपटगृहे डोक्यावर घेतल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी दिसत आहे, अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक पडद्यासमोर नाचून आनंद साजरा करत असल्याचे व्हिडीओज सोशल मीडियामध्ये मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.

पहिल्याच दिवशी हा चित्रपट 50 कोटींहून अधिक कमाई करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बॉलिवूडसाठी हा एक माइलस्टोन ठरेल असे देखील बोलले जात आहे.

देशभरात काही ठिकाणी विरोधप्रदर्शन केली जात असली तरी चाहत्यांची चित्रपट पाहण्यासाठी उसळलेली गर्दी पाहता हा चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढेल असा असा देखील अंदाज वर्तविण्यात येत आहे.


महत्वाचे म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान देखील पठाणमध्ये पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले. अनेकांनी सलमान आणि शाहरुखचे स्क्रीनवरील एकत्रित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.


पहिल्या दिवशी चित्रपटाला मिळत असलेला तुफान प्रदिसात पाहून पहिल्याच दिवशी पठाणचे 300 श वाढविण्यात आले. जगभरात 8000 स्क्रीनवर पठाण चित्रपट दाखविण्यात येत असून त्यातील 5500 स्कीन भारतात तर 2500 स्क्रीन परदेशातील असल्याचे देखील सांगितले जात आहे.

अनेक चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटाला 4.5 स्ट्रारचे रेटिंग दिले आहे. आयएमडीबीवर अद्याप या चित्रपटाचे रेटिंग दाखविण्यात आलेले नाही. हा चित्रपट दोन तास २६ मिनीटांचा असून हा अॅक्शनपट ब्लॉकबस्टर ठरेल असे देखील अंदाज वर्तविण्यात येत आहेत. देशभरात आज प्रेक्षकांनी पठाण चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. चित्रपटगृहांमध्ये उसळलेली गर्दी, प्रेक्षकांचा थिएटरमधील सळसळता उत्साह, थिएटर बाहेरील रांगा पाहता चार दिवसांत हा चित्रपट 200 कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज देखील वर्तविला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी