30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeसिनेमास्टीवन स्पीलबर्ग एस.एस. राजामौलींच्या 'आरआरआर' चित्रपटावर फिदा!

स्टीवन स्पीलबर्ग एस.एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’ चित्रपटावर फिदा!

एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR film) चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला नुकताच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. तसेच ऑस्करसाठी देखील या गाण्याला नामांकन मिळाले होते. या चित्रपटाला देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जगभरात या चित्रपटाने प्रेक्षकांवर जादू केली. आता हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग (Steven Spielberg) यांना देखील या चित्रपटाने वेड लावले आहे. स्पीलबर्ग यांनी एका कार्यक्रमात नुकतेच आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांचे कौतुक केले. (Steven Spielberg Appreciation of SS Rajamouli’s RRR film)

स्टीवन स्पीलबर्ग यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला ‘द फैबलमैन्स’ हा चित्रपट नुकताच भारतात प्रदर्शित झाला आहे. दरम्यान एका कार्यक्रमात स्पीलबर्ग यांनी राजामौली यांच्याशी बोलताना या चित्रपटाचे तसेच चित्रपटातील कलाकार अभिनेता ज्युनियर एनटीआर, रामचरण आणि अभिनेत्री अलिया भट यांचे देखील त्यांनी तोंडभरुन कौतुक केले.

स्टीवन स्पीलबर्ग या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, हा चित्रपट माझ्यासाठी अद्भूत अनुभव होता. माझा माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता, हे सर्व माझ्यासाठी रोमांचक असे होते. माझ्यामते ज्यूनियर एनटीआऱ, रामचरण आणि अलिया भट यांच्या भूमिका देखील प्रभावी होत्या.

हे सुद्धा वाचा

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

अमृता खानविलकर म्हणते, ‘ललिता बाबर’चा चित्रपट हा माझा सर्वोच्च सन्मान

‘गांधी गोडसे:एक युद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र

स्टीवन स्पीलबर्ग हे प्रसिद्ध हलिवूड दिग्दर्शक असून त्यांना दोनवेळा ऑस्कर मिळाला आहे. राजामौली स्टीवन स्पीलबर्ग यांना आपली प्रेरणा मानतात. या कार्यक्रमात भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळण्यासाठी काय करायला हवे असा प्रश्न राजामौली यांनी स्पीलबर्ग यांना केला. त्यावर स्पीलबर्ग यांनी अत्यंत मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, मी कोणता सल्ला देणार नाही, मात्र तुम्ही तुमच्या देशातील गोष्ट सांगायला हवी आणि ती गोष्ट जगाला आवडते म्हणून ती गोष्ट जगाच्या कहानीशी जोडू नये, कारण असे केल्यात तुम्ही ते काम मनापासून नाही करु शकत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी