33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeसिनेमाकान्स चित्रपट महोत्सवासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’ आणि ‘मदार’ चित्रपटांची निवड

कान्स चित्रपट महोत्सवासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’ आणि ‘मदार’ चित्रपटांची निवड

राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात. मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. 2023 मधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटेरी ”आणि मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” सिनेमांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने चित्रपट निवडीसाठी परीक्षण समिती तयार केली होती. या तज्ज्ञ समितीमध्ये अशोक राणे, मनोज कदम, डॉ.संतोष पाठारे, सचिन परब, उन्मेष अमृते, मंगेश मर्ढेकर, मनीषा कोरडे, अनिकेत खंडागळे यांचा समावेश होता.

हे सुद्धा वाचा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे भवितव्य अधांतरीच ! सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाही

पवारांच्या वक्तव्यानंतर वंचितचा काँग्रेसच्या अदानीप्रकरणात जेपीसीच्या मागणीला पाठींबा

गद्दारांना जनताच रस्त्यावर पकडून मारणार : संजय राऊत

यासाठी एकूण ३४ मराठी चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले होते. त्यातून समितीने डिवाइन टच प्रोडक्शन निर्मित “टेरिटरी”, पायस मेडिलिंक प्रायव्हेट लिमिटेड निर्मित “या गोष्टीला नाव नाही” आणि एम एस फॉरमॅट फिल्म निर्मित “मदार” या चित्रपटाची निवड केलेली आहे. या तीन चित्रपटात काही तांत्रिक समस्या आल्यास टाईमप्लस प्रोडक्शनचा “ गाव” आणि परफेक्ट ग्रुप निर्मित “गिरकी” हे चित्रपट पाठविण्यात येतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी