पॉप गायक जस्टिन बीबरची पत्नी हेली बीबरला धमक्या येत आहेत. हॉलीवूडची प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझ हिनेच हा खुलासा केला आहे. चाहत्यांनी हेलीला सतावू नये, असे आवाहनही तिने केले आहे. सेलेना गोमेझ आणि जस्टिन बीबर हे डेट करत होते. चाहत्यांना ही जोडी आवडतही होती. मात्र, जस्टिनने हेलीशी लग्न केल्याने सेलेनाच्या चाहत्यांचा तिच्यावर राग आहे. त्यातूनच हेली बीबरला जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
हेली बीबरनेच तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, अशी माहिती दिल्याचा खुलासा सेलेना गोमेझने इंस्टाग्राम स्टोरीतून केला आहे. हेलीच्या नादी लागून जस्टिन बीबरने सेलेनाला धोका दिला, अशी चाहत्यांची भावना झाली आहे. ते हेलीला दोषी मानत आहेच; पण आधी सेलीनासोबत मौज-मस्ती करणाऱ्या जस्टिनवरही चांगलेच भडकले आहेत. अशा स्थितीत हेली बीबरचा बचाव करण्यासाठी सेलेना गोमेझ पुढे सरसावली आहे. तिने चाहत्यांना दोघांबद्दल आणि त्यांच्या कथित भांडणाबद्दल तर्क-वितर्क थांबविण्यास सांगितले आहेत.

सेलेनाने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. त्यात ती म्हणते, की हेलीने तिच्याशी संपर्क साधला होता. तिने एक मेसेज पोस्ट केला. त्यावरून हेलीला यावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे दिसते. सेलेनाने चाहत्यांना दोघातील संबंधांबाबत कोणतीही नकारात्मकता व्यक्त करू नये, असे आवाहन केले आहे. हेलीला धमकावू नये, अशी विनंतीही सेलेनाने केली आहे.

सेलेना इंस्टाग्राम स्टोरीत लिहिले आहे, “हेली बीबरने माझ्याशी संपर्क साधला. तिला जीवे मारण्याच्या धमक्या आणि घृणास्पद नकारात्मकता मिळत असल्याचे तिने सांगितले. चाहत्यांनो, मला हे मुळीच अपेक्षित नाही. कोणीही द्वेष किंवा गुंडगिरीच्या मार्गाने जाऊ नये. मी नेहमीच दयाळूपणाचा पुरस्कार केला आहे. सध्या हे जे काही चालले आहे, ते सर्व थांबावे अशी माझी इच्छा आहे.” या स्टोरीच्या शेवटी सेलेनाने रेड हार्ट इमोजी वापरला आहे.
पॉप सिंगर जस्टिन बीबर हा आधी सेलेनाचा प्रियकर होता. दोघे डेटिंग करत होते. पण जस्टिनने हेलीशी लग्न केले. तेव्हापासून गेल्या काही आठवड्यात ती सोशल मीडियावर ट्रॉलर्सची शिकार होत आहे. हेलीवर सेलेनाचा प्रियकर पळविल्याचे आरोप केले जात आहेत. विशेषतः टिकटॉकवर हेलीला ट्रॉल केले जात आहे. सेलेनाने टिकटॉक आणि इंस्टाग्राम स्टोरीजवर स्वत:चे काही फालतू व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांचा राग वाढला आहे. हेली ही एक “मीन गर्ल” आहे, ती आणि तिचे मित्र सेलेनाशी व्यवस्थित वागले नाहीत, असा रोष युझर्स व्यक्त करीत आहेत. सेलेनाने “लॅमिनेटेड केलेल्या भुवयांचा” फोटो शेअर केला होता. त्यावर, हेलीची मैत्रीण काइली जेनरने इंस्टाग्राम स्टोरीवर “हा योगायोग की अपघात?” म्हणून सेलेना गोमेझ व हेली बीबर दोघींच्याही भुवयांचा फोटो शेअर केला होता. सेलेनाच्या चाहत्यांना हेलीच्या मैत्रिणीचा हा आगाऊपणा आवडला नाही. त्यांनी तिलाही चांगलेच झापून काढले होते.
हे सुद्धा वाचा :
जस्टिन बीबर गंभीर आजाराशी लढत असताना, अर्धा चेहरा पॅरालाइझ्ड
अवॉर्ड फंक्शनमधून रेड कार्पेट गायब! ऑस्करची 62 वर्षांची परंपरा बदलणार
त्यानंतर सेलेनाने या समर्थनाबद्दल टिकटॉकवर चाहत्यांचे आभार मानले होते. “कृपया दयाळू व्हा आणि इतरांच्या मानसिक आरोग्याचा विचार करा. माझे अंतकरण जड झाले आहे, मला प्रत्येकासाठी फक्त चांगले हवे आहे. सर्वांना माझे सर्व प्रेम,” असे सेलेनाने या आभाराच्या पोस्टमध्ये म्हटले होते. तिने सोशल मीडियातून हेलीला प्रथमच नावाने थेट संबोधले होते. सेलेना सध्या स्टीव्ह मार्टिन आणि मार्टिन शॉर्टसह एमी-नॉमिनेटेड सीरिज ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंगच्या तिसऱ्या सीझनसाठी शूटिंग करत आहे.