26 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरसिनेमाटीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर सेटवरच गळफास लावून...

टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर सेटवरच गळफास लावून केली आत्महत्या!

तुनीषा शर्मा या 20 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर शूटिंगच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्येच्या 5 तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही नोट्स आणि फोटोही शेअर केला होता. 'फितूर' या चित्रपटात तुनीषाने कतरिना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

तुनीषा शर्मा या 20 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर शूटिंगच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. (TV Actress Tunisha Sharma Suicide) तिने आत्महत्येच्या 5 तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही नोट्स आणि फोटोही शेअर केला होता. ‘फितूर’ या चित्रपटात तुनीषाने कतरिना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

तुनीषा ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होती. दबंग 3, कहानी 2, बार बार देखो इत्यादी चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. सध्या तिच्याकडे अलीबाबा दास्ताने काबुल या चित्रपटातील राजकुमारी मरियमची भूमिका होती. मुंबईतील एका सेटवर आज म्युझिक व्हिडिओ शूट करण्यासाठी तुनीषा गेली होती. मात्र, या सेटवरच तिने गळफास घेतला. सेटवरील लोकांनी तिला लटकलेल्या अवस्थेत पाहिले. तिला खाली उतरवून तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयाच्या वाटेवरच तुनीषाचा मृत्यू झाला. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. खरेतर तिचा दिनक्रम अगदी सामान्य होता. नेहमीप्रमाणे तिने इन्स्टाग्रामवर शेअरिंगही केले होते. मात्र, आत्महत्येच्या तासभर आधीच तुनीषाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “जो अपने जुनून से आगे बढ़ते हैं वो रुकते नहीं हैं,” असे या पोस्टमध्ये लिहिले होते.

भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या टीव्ही शोमधून तुनीषा शर्माने करिअरची सुरुवात केली होती. गब्बर पूंछवाला, महाराणा रंजीत सिंह, चक्रवर्ती सम्राट अशोक, इंटरनेट वाला लव, शेर ए पंजाब आणि इश्क शुभान अल्लाह यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये ती दिसली होती.

TV Actress Tunisha Sharma Suicide InstaGram Post
आत्महत्येच्या तासभर आधीच तुनीषाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “जो अपने जुनून से आगे बढ़ते हैं वो रुकते नहीं हैं,” असे या पोस्टमध्ये लिहिले होते.

हे सुद्धा वाचा : 

सुशांतने आत्महत्याच केली; ‘एम्स’चे शिक्कामोर्तब

Vaishali Thakkar Suicide : घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीची आत्महत्या! इंस्टाग्राममार्फत 5 दिवसांपूर्वीच दिले होते संकेत

AU मुद्यावरून वातावरण पुन्हा तापले

तुनिषा शर्माच्या आत्महत्येने अनेक जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. यापूर्वी अनेक कलाकारांनी तरुण वयात आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वीच ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन तर आजही राजकारण सुरू आहे. बालिका वधू मालिकेतून घरोघरी पोहोचलेल्या प्रत्युषा बनर्जीने वयाच्या 24 व्या वर्षीच आयुष्य संपविले होते. फेमस टीवी एक्टर कुशल पंजाबी, क्राइम पेट्रोल मालिकेतील प्रेक्षा मेहता, मनमीत ग्रेवाल, ‘गजनी’मधील जिया खान, ‘दिल तो हैप्पी है जी’ मधील सेजल शर्मा या आणि अशा अनेक तरुण कलाकारांनी आत्महत्येचा मार्ग निवडून जीवन संपविले. या सर्व दुर्दैवी कलाकारांच्या पंक्तीत आज तुनीषा शर्माचे नाव जोडले गेले.

TV Actress Tunisha Sharma Suicide, Sushant Singh Death, Katrina Kaif Fitoor

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!