महाराष्ट्र

महावितरणचे अतिरिक्त सुरक्षा बील ठेव आणि प्रीपेड मीटरच्या बाबतीत वीजतज्ञ प्रताप होगाडेंची मोठी घोषणा

एकीकडे जनता माहागाईने त्रस्त झाली आहे तर दुसरी राज्यात कोळशा अभावी संकट कोसळले आहे. पण आता, भारनियमनाबरोबर नागरिकांना वाढीव वीज बिल भरण्यासंबंधीत एक दिलासा दायक बातमी आहे.

टीम लय भारी

मुंबई : एकीकडे जनता माहागाईने त्रस्त झाली आहे तर दुसरी राज्यात कोळशा अभावी संकट (MSEDCL) कोसळले आहे. पण आता, भारनियमनाबरोबर नागरिकांना वाढीव वीज बिल भरण्यासंबंधीत एक दिलासा दायक बातमी आहे. राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले महावितरण कंपनीने लागू केली आहेत. यासंबंधी ग्राहकांमध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. (MSEDCL Additional Security Bill Deposit Information)

महावितरणचे अतिरिक्त सुरक्षा बील ठेव आणि प्रीपेड मीटरच्या बाबतीत वीजतज्ञ प्रताप होगाडेंची मोठी घोषणा

ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य नाही, अशा ग्राहकांनी ही रक्कम सहा हप्त्यांत भरावी. अथवा तेही शक्य नसल्यास प्रीपेड मीटरची मागणी करावी म्हणजे कोणतीही सुरक्षा ठेव (MSEDCL)भरावी लागणार नाही.तसेच ५% वीजदर सवलतही मिळेल. अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी जाहीर केले आहे.

सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. आता ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ही रक्कम भरण्यासाठी विनियमांमध्ये सहा हप्त्यांची सवलत दिलेली आहे. तथापि महावितरणने ग्राहकांवर (MSEDCL) एकरकमी संपूर्ण रकमेची मागणी बिले लागू केली आहेत.

हे सुद्धा वाचा :- 

Maharashtra electricity board issues advisory on fraudulent messages to customers

गृहमंत्री वळसे पाटलांनी PWD अधिकाऱ्यांचे कान उपटले !

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close