सिनेमा

व्हायरस परत आलाय, अभिनेत्री मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील सर्वात गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून कायम मुक्ता बर्वेकडे पाहिलं जातं. 'जोगवा', 'आम्ही दोघी' मुंबई-पुणे-मुंबई अशा कितीतरी चित्रपट आणि मालिकांमधून मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे

टीम लय भारी 

मराठी कलाविश्वातील सर्वात गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून कायम मुक्ता बर्वेकडे (Mukta Barve) पाहिलं जातं. ‘जोगवा’, ‘आम्ही दोघी’ मुंबई-पुणे-मुंबई अशा कितीतरी चित्रपट आणि मालिकांमधून मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या मुक्ता बर्वे कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसापूर्वी ‘स्टोरीटेल’ मराठीवर तिची ‘Virus -पुणे’ ही एक सीरिज आली होती.(Mukta Barve’s viral post on social media in discussion)

व्हायरस परत आलाय, अभिनेत्री मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

आता याचा दुसरा भाग ‘Virus -२ Pune’ घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतीच तिनं याची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. सध्या मुक्ताची (Mukta Barve) ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय.

 

मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? ‘व्हायरस २ पुणे’ या स्टोरीटेल (Mukta Barve) मराठी वरील ऑडिओ सिरीज विषयीची ही तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. चाहते देखीलत मुक्ताच्या या नवीन सीरिजबद्दल विशेष उत्साही आहेत.

‘Virus- पुणे’ या मुक्ताच्या (Mukta Barve) सीरीजच्या पहिल्या सिजनला कमाल लोकप्रियता मिळाली होती आणि त्यामुळे दुसऱ्या सीजनची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुक्ताच्या दुसऱ्या सिझनला स्टोरीटेलवर अद्भुत असा प्रतिसाद मिळत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी आलेल्या मुक्ताच्या‘अॅडिक्ट’ या पहिल्या सीरिजलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. यामध्ये डॉ. रक्षा नावाच्या एका महिलेची ती गोष्ट सांगण्यात आली होती. जिच्या आयुष्यात ती अशा एका घटनेला सामोरे जाते त्यानंतर त्याचे तिला व्यसन लागते. मात्र, हे काही ड्रग्ज, अल्कोहोल इत्यादींचे व्यसन नाही. तिच्या या विचित्र व्यसनामुळे तिचे आयुष्य रंजक आणि भयानक वळण घेते.

हे सुद्धा वाचा :- 

Marathi Actress Mukta Bharve’s Audio series Virus-Pune Season 2 Releases Today

माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार का?

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close