32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeक्राईमदागिने चोरांचा सुळसुळात, सिंगम स्टाईलमध्ये मुलुंड पोलीसांनी चोरांना केले अटक

दागिने चोरांचा सुळसुळात, सिंगम स्टाईलमध्ये मुलुंड पोलीसांनी चोरांना केले अटक

टीम लय भारी 

मुंबई:- घरातील शुभोभिकरण आणि वायरिंगचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने चक्क राहत्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. मुंबईतील मुलुंड परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी घरमालक रविकिरण नाईक यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. (Mumbai Police Admirable performance) 

यानंतर पोलिसांनी ( Mumbai Police) तपास करून आरोपी रविकांत रामनारायन विश्वकर्मा (वय ३३ वर्षे) यास अटक केली आहे. मुलुंडच्या टाटा कॉलनीमध्ये राहणाऱ्या रविकिरण नाईक यांच्या घराचे शुभोभिकरण करण्याचं काम सुरू होतं. यातच वायरिंगचही काम करण्यासाठी आरोपी रविकांत विश्वकर्मा आला. काही दिवस त्याने काम केलं पण त्याची नजर घरातील कपाटात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर होती. रविकिरण यांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग कपाटाच्यावर ठेवली होती.

आरोपी रविकांत याची नजर कापटवर ठेवलेल्या बॅगवरच होती. घरामधील काम करणाऱ्या इतर कामगारांची नजर चुकवून त्याने ती बॅग पळवली. आपल्यावर पोलिसांचा( Mumbai Police) संशय येऊ नये यासाठी त्याने बागेतील काही दागिने हे दुसऱ्या कामगाराच्या बागेमध्ये लपविले. ज्यावेळी रविकिरण यांना घरामध्ये बॅग आढळून आली नाही त्यावेळी त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली.

पोलिसांनी घरात शुभोभिकरणाचे काम करणाऱ्या बारा कामगारांची झाडाझडती घेतली. ज्यामध्ये रविकांत विश्वकर्मा याच्यावर पोलिसांचा( Mumbai Police) संशय बळावला आणि पोलिसी खाक्या दाखविताच अखेर रविकांतने ते दागिने आपणच चोरले असल्याचं कबूल केलं. तसेच आपल्यावर चोरीचा आळ येऊ नये यासाठी दुसऱ्या कामगाराच्या बॅगमध्ये काही सोनं लपवलं असल्याचंही कबूली दिली.

हे सुध्दा वाचा

Mumbai Crime: मुंबई पोलिसांना मिळालं मोठं यश, 15 दिवसांत 8 कोटींच्या सोन्याच्या चोरीच्या गुन्ह्याची उकल, 10 जणांना अटक

लोअरपरेल येथे एमटीएनएलच्या वायरची होतेय चोरी चोरीमागे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हात

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी