29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईशिवसेनेचे 14 खासदार शिंदेगटाच्या वाटेवर

शिवसेनेचे 14 खासदार शिंदेगटाच्या वाटेवर

टीम लय भारी

मुंबई: एकनाथ शिंदेने शिवसेनेमध्ये बंडखोरी केली. त्यांच्या सोबत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्याप्रमाणे आता खासदारांनी देखील हीच वाट चोखळण्याचे ठरवले आहे. आज हाॅटेल ट्रायडंटमध्ये शिंदेगटाच्या आमदारांची बैठक होती. या बैठकीमध्ये शिवसेनचे 14 खासदार आॅनलाईन उपस्थित होते. त्यामुळे आता शिवसेनेचे 14 खासदारही शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेनेकडे 19 खासदार आहेत. पैकी एक दादरा नगर हवेलीचे खासदार आहेत. या बंडखोर आमदारांमध्ये ईडीचा ससेमीरा लागलेल्या भावना गवळींसह इतर खासदारांचा देखील सहभाग आहे.

उदय सामंत यांनी माध्यमांना या बाबत सांगितले होते. 12 ते 14 आमदार शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली होती. ते म्हणाले होते की, शिवसेनेमध्ये असलेले अनेक आमदार मनाने शिंदे गटाकडे आहेत. केवळ शरीराने शिवसेनेमध्ये आहेत. एकूणच आमदार आणि खासदारांना फोडण्याचे षडयंत्र भाजपने अगदी नियोजीतपणे आखले आहे. त्यामुळेच ते यशस्वी होतांना दिसत आहेत.

हे सुध्दा वाचा:

पावसाच्या पाण्याने घातला विदर्भाला वेढा

साईबाबांच्या तिजोरीत 5 कोटी 12 लाखांचे दान

इंदौरहुन पुण्याला येणारी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन’ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55 प्रवासी होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी