31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईरुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

अवजड वाहने आणि डंपर हे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहतूक कोंडीमुळे महामार्गाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, दहिसर चेकनाका व ते कासा येथून येणारे २-३ रूग्ण आठवड्यात दगावतात ही वस्तुंस्थिती आहे.

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे शुक्रवारी (२० जानेवारी) एका रस्ता अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दिल्ली दरबार हॉटेलजवळ शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला होता. माजी मंत्री या अपघातातून थोडक्यात बचावले. याच अनुषंगाने प्रसंगावधन बाळगत डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रुग्णवाहिका, डंपर आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करण्याची सक्ती करावी, यासह अनेक सूचना केल्या आहेत. (A separate route should be implemented for ambulances; Former Health Minister’s suggestion to CM)

डॉ. सावंत यांनी केलेल्या सुचनांनुसार, मेट्रोच्या कामांमुळे लोकांचे हाल होत आहेत, रस्ते उखडले गेले आहेत. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरातील बेशिस्त बांधकामे बंद करा. मुंबईतील डंपर पहाटे अडीच वाजल्यापासून बेशिस्तपणे रस्ते छाटण्याचे काम करतात. पार्किंगच्या हातगाड्यांमुळे सर्वसामान्यांचा जीव तुडवला जातोय. यासर्व बाबींकडे लक्ष देवून आपण रस्ते अपघाताची माहिती घ्यावी, असे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना देण्यात आले आहे.

काशिमीरा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप कदम यांनी सांगितले की, डॉ. दीपक सावंत हे गेल्या शुक्रवारी (20 जानेवारीला) सकाळी पालघर आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पालघरच्या दिशेने जात होते. संगणाई देवी मंदिराजवळ डंपरने त्यांच्या कारला मागून धडक दिली. माजी मंत्री या अपघातातून थोडक्यात बचावले, मात्र त्यांना अंतर्गत जखमा झाल्या आहेत. डंपर चालक इर्शाद शहजाद खान याला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात सावंत यांच्या कारच्या मागील भागाचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी डंबर चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. डॉ. सावंत यांच्या अपघाताचे कारण अद्यापही असपष्ट आहे.

हे सुद्धा वाचा : माणगावमध्ये भीषण अपघातात ९ जण जागीच ठार

नेपाळमध्ये विमान अपघातात ४० ठार

सर्वसामान्यांच्या हितासाठी बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोलचे काम केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत दिल्ली दरबार हॉटेलजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांना उपचारासाठी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटी-केअर रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या डॉ. दीपक सावंत यांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सावंत यांनी आपले अनुभव आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल मांडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी