30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeमुंबईAaditya Thackeray : शिंदे सरकार महाराष्ट्रातील रोजगार पळवतेय; आदित्य ठाकरेंचा आरोप

Aaditya Thackeray : शिंदे सरकार महाराष्ट्रातील रोजगार पळवतेय; आदित्य ठाकरेंचा आरोप

शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे, असा टोला आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागवण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. यातच महाराष्ट्रात असलेले काही प्रकल्प सुद्धा आता इतर राज्यात जात असल्याने यामुळे वेगळेच राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केलेली असताना विरोधक सत्तेत असताना त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे प्रकल्प इतरत्र जात असल्याचे आरोप सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर करण्यात येत आहे. दरम्यान आज (ता. 21 सप्टेंबर) शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे, असा टोला आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागवण्यात आला आहे. तसेच शिंदे सरकार हे महाराष्ट्रातील तरुण-तरुणींचे आर्थिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातून बाहेर जात असलेले प्रकल्प आणि नव्याने होणाऱ्या प्रकल्पांबाबत अनेक विधाने केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी खास करून वर्सोवा-बांद्रा सी-लिंक च्या प्रकल्पावर भाष्य केले. वर्सोवा-बांद्रा सी-लिंक प्रकल्प हा सध्या बंद आहे. पण याआधी हा प्रकल्प ज्या काँट्रॅक्टरला देण्यात आला होता. त्यांच्याकडून तो काढून आता हा प्रकल्प दुसऱ्या काँट्रॅक्टराला देण्यात आला आहे. त्यामुळे या नव्या सी-लिंक वर एक नाही तर चार टोल लावण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांच्याकडून यावेळी देण्यात आली.

हा प्रकल्प कोणत्या कंपनीला देण्यात आला आहे, याबाबत काहीच बोलायचे नाही. पण या प्रकल्पासाठी या नव्या कंपनीने महाराष्ट्रात नव्हे तर चेन्नईमध्ये येत्या रविवारी मुलाखती घेण्याचे ठरवले आहे. प्रकल्प होणार मुंबईमध्ये मग या कामासाठीच्या भरती मुलाखती या चेन्नईमध्ये का ? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

जर प्रकल्प हा मुंबईमध्ये होत आहे, तर या कामाच्या मुलाखती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई येथील तरुण तरुणींसाठी होणे अपेक्षित आहे. पण या मुलाखती चेन्नईमध्ये होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रोजगाराविषयी,भूमीपुत्रांच्या हक्काविषयीचा प्रश्न निर्माण होत आहे. मला चेन्नई किंवा गुजरातवर आक्षेप नाही, पण काम जर मुंबईत असेल तर मग केवळ चेन्नईमध्ये मुलाखती का? त्याचसोबत मुंबई, ठाणे, संभाजीनगर या सारख्या शहरातही मुलाखती व्हाव्यात, असे मत यावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, राज्याच्या उदोगमंत्र्यांना याबाबत काहीही माहित नाही, असे म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांना आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबत महत्वाची भूमिका जी त्यांनी स्पष्ट करावी. हे सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या संमतीने सुरू आहे आणि जर का असे काही नसेल तर याबाबत त्यांना काहीच माहित नसावे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. शिंदे सरकारमुळे सध्या राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींचे आर्थिक खच्चीकरण होत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Aditya Thackeray : ‘ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा हे केवळ बालिश चाळे’, सुषमा अंधारेंचा पलटवार

Raju Srivastav Passed Away : हास्यवीर राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Prakash Ambedkar : ‘आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत’

याचवेळी आदित्य ठाकरे यांना रामदास कदम यांच्याबाबत देखील विचारण्यात आले. परंतु रामदास कदम यांच्यावर किंवा राजकारणाच्या कोणत्याही मुद्द्यावर मी काहीही बोलणार नाही असे म्हणत रामदास कदम यांचा फोकस सध्या आम्हाला बदनाम करण्यावर आहे, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी