28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईएसी लोकलचा प्रवाशांना दणका; स्टेशन आले तरी दरवाजे उघडलेच नाहीत

एसी लोकलचा प्रवाशांना दणका; स्टेशन आले तरी दरवाजे उघडलेच नाहीत

टीम लय भारी 

मुंबई : मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणून गणल्या गेलेल्या लोकलमधून असंख्य मुंबईकर रोजच प्रवास करत असतात. थंडी, ऊन, वारा, पाऊस काहीही असो ही लाईफलाईन अखंड मुंबईकरांच्या सेवेत हजर असते. हा लोकल प्रवास आणखी सुखकर झाला असून लोकलच्या ताफ्यात एसी लोकल सुद्धा सामील झाल्या आहेत. रोजच्या या लोकल प्रवासात अनेक गमती – जमती घडत असतात, जे लोक सोशल मिडीयावर व्हायरल करतात आणि नेटकऱ्यांसुद्धा यानिमित्ताने चर्चेचा विषय मिळतो.

यावेळी सिद्धेश सावंत यांनी एसी लोकलमधील एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे, त्यामध्ये “आणि दादरला एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत!” असे कॅप्शन दिले आहे.

सकाळी ऑफिसला जाण्यासाठी मुंबईकरांची खूपच लगबग असते, वेळेत ऑफिसला पोहोचण्यासाठी बरेचसे जण लोकल, एसी लोकलचा पर्याय निवडतात. आज मुसळधार पावसात सुद्धा लगबगीने लवकर ऑफिस गाठण्यासाठी मुंबईकरांनी एसी लोकल पकडली, भर पावसात लोकल दादर स्टेशनमध्ये आली खरी परंतु एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत.

पहाटेची कल्याण – सीएसटी एसी ट्रेन आज दादर स्टेशनमध्ये आली. प्रवाशांनी उतरण्यासाठी रांग सुद्धा लावली परंतु लोकलचे दरवाचे उघडलेच नाहीत. आता पुढच्या स्थानकांत उतरावं लागणार का, पण पुढच्या स्थानकात उतरलो तरी दरवाजे उघडणार का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये रंगली होती.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे खूप वेळ दादर स्थानकात थांबली, दरम्यान दरवाजे उघडले नसल्याचे लक्षात येताच मोटरमनने दरवाजे उघडले आणि प्रवाशांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला.

हे सुद्धा वाचा…

दहशतवादांच्या निशाण्यावर RSS कार्यालय?

काय….? डासांपासून होणार आता लवकरच सुटका

शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी सुरूच

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी