टीम लय भारी
मुंबई : मराठी भाषेबाबत कायमच मराठी अभिनेता-अभिनेत्री मते व्यक्त करताना दिसून येतात. असेच मराठी भाषेबाबतचे मत अभिनेता सचिन खेडेकर (Actor Sachin Khedekar) यांनी व्यक्त केले आहे. याबद्दलचा व्हिडीओ मराठी एकीकरण समितीकडून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मराठी एकीकरण समितीने सचिन खेडेकर यांना धन्यवाद देखील बोलण्यात आले आहे.
सचिन खेडेकर यांचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. सर्वच लोक हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या ज्ञानात भर पडत आहे. तर पैसे सुद्धा कमवत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या सर्व पर्वांना प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सुरु असलेल्या या पर्वात सचिन खेडेकर यांच्याकडून मराठी भाषा आणि मराठी तरुणांच्या नोकरीबाबत भाष्य (Actor Sachin Khedekar made a big statement about Marathi language) करण्यात आले आहे. हा ४७ सेकंदाचा व्हिडीओ मराठी एकीकरण समितीकडून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.
‘तुम्हाला कॉल सेंटरला फोन लावायचा असतो. इंग्रजी, हिंदी आणि मराठी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी निवडता. तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता. तिथेही मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तीन भाषांचे पर्याय असतात. त्यावेळीही तुम्ही मराठी पर्याय निवडता. तुम्हाला मार्केटींगवाल्यांचा फोन येतो. तुम्हाला त्यांच्यासोबत हिंदी किंवा इंग्रजीतून बोलायला लागते. त्यावेळी तुम्ही मराठी बोलायचा आग्रह धरा. खरंतर सहसा असे होत नाही. पण व्हायला पाहिजे. कारण हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही. हा हजारो लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. मराठीचा आग्रह धरुया. कारण आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल. व्यवसाय मिळेल. आपण एक पाऊल पुढे टाकूया. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल, असे भाष्य त्यांनी ‘कोण होणार करोडपती’च्या एका भागात केले आहे.
धन्यवाद सचिन खेडेकर साहेब सहकार्य केल्याबद्दल. @SachinSKhedekar#महाराष्ट्रातमराठीच#मराठीएकीकरणसमिती#मराठी_आग्रह #मराठी_नोकरी #मराठी_अर्थकारण
व्हिडिओ साभार @sonymarathitv pic.twitter.com/Figq8zWvXf
— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) July 27, 2022
या व्हिडिओला मराठी एकीकरण समितीकडून पोस्ट करण्यात आल्यानंतर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. हा व्हिडोओ पोस्ट करताना त्यांनी ‘धन्यवाद सचिन खेडेकर साहेब सहकार्य केल्याबद्दल.’ असे लिहीत सचिन खेडेकर यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या भाष्यासाठी आभार व्यक्त केले आहेत.
हे सुद्धा वाचा :
पुरेसे इंधन नसताना गाडी चालवली म्हणून वाहतूक पोलिसांनी पाठवले चलन
मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी; मुख्यमंत्र्यांवर अन्य मंत्री वैतागले !
प्रवाशांची पंचाईत! टॅक्सी, ऑटो चालकांचा 1 ऑगस्टपासून बेमुदत संप