28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमुंबईकोणाचे काय तर कोणाचे काय...? 'आरे'च्या 'कारे'वर सुमीत राघवनने केलेली प्रतिक्रिया वादात

कोणाचे काय तर कोणाचे काय…? ‘आरे’च्या ‘कारे’वर सुमीत राघवनने केलेली प्रतिक्रिया वादात

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील सत्तानाट्यानंतर मुंबईत आता आरेचा मुद्दा पुन्हा पेटलाय. महाविकास आघाडीने आरेला जंगल घोषित करून मेट्रो कारशेडच्या मुद्द्याला पिटाळून लावले, परंतु शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत येताच आरेचा मुद्दा पुन्हा लावून धरत मेट्रो कारशेड आरेतच होणार अशी ठाम भूमिका घेतली आहे. या भूमिकेला अभिनेता सुमीत राघवन याने समर्थन दर्शवून “येस.. अब आयेगा मजा” असे म्हटले आहे. सोशल मिडीयावर व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया एका नव्या वादात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘मेट्रो 3’साठी (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच करणार अशी नव्या सरकारची ठाम भूमिका आहे, तर शिवसैनिक, पर्यावरणवादी, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी असे सगळेच या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत. दरम्यान, अभिनेता सुमीत राघवन याने सुद्धा यावर सोशल मिडीयाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली असून ती नव्या सरकारच्या निर्णयाला संमती दर्शवणारी आहे.

 

दरम्यान आरेच्या कळीच्या मुद्यात अश्विनी भिडे यांची मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पुन्हा झालेली नियुक्ती हा सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. अशा सगळ्याच विषयावर भाष्य करत सुमीत राघवन यांनी मत व्यक्त केले आहे.

ट्विटमध्ये राघवन लिहितात, “अब आएगा मजा.. मला कायम असे वाटायचे की हा प्रोजेक्ट पूर्णत्वास जाताना तुम्ही तिथे असायला हव्यात आणि आता तुम्ही तिथेच आहात. मुंबईकर तुमच्या प्रतीक्षेत होते”, असे म्हणून राघवन यांनी कौतुकाने अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे पत्रक सुद्धा पोस्ट केले आहे.

सुमीत राघवन यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून सोशल मिडीयावर व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया एका नव्या वादात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

महाराष्ट्र सरकारची आणखी एक मोठी घोषणा

भारतात आढळला दुर्मिळ रक्तगट; जगात केवळ 9 जणांशीच होतो मॅच

ब्रेकिंग ! महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!