28 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमुंबईधारावीचं घबाड अदानीच्या घशात!

धारावीचं घबाड अदानीच्या घशात!

धारावीचं घबाड शेवटी अदानीच्याच घशात घालण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पातून आता अदानीला मुंबईतील वांद्रा-कुर्ला या मध्यवस्तीतील प्राईम लोकेशनमध्ये एक कोटी चौरस फुटांहून अधिक जागा आंदण मिळणार आहे.

धारावीचं घबाड शेवटी अदानीच्याच घशात घालण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पातून आता अदानीला मुंबईतील वांद्रा-कुर्ला या मध्यवस्तीतील प्राईम लोकेशनमध्ये एक कोटी चौरस फुटांहून अधिक जागा आंदण मिळणार आहे. त्यातून आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा लौकीक मिळविलेल्या धारावीचा चेहरामोहरा 2040 पर्यंत पूर्णतः बदलणार आहे. अदानी समूहाने 5,069 कोटी रुपयांच्या बोलीसह हा धारावी पुनर्विकास प्रकल्प खिशात घातला आहे. येत्या 17 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. याशिवाय, पुढील सात वर्षांत पुनर्वसन पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.

अदानी रियल्टी, डीएलएफ आणि नमन ग्रुप या तीन कंपन्यांनी धारावीचा पुनर्विकास आणि झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी निविदा सादर केल्या होत्या. आज, 29 नोव्हेंबर रोजी या आर्थिक निविदा उघडल्या गेल्या. गेल्या 15 वर्षात महाराष्ट्र सरकारने पुनर्विकासासाठी किमान चार प्रयत्न केले. मात्र, आजवर कोणत्याही निविदा प्रत्यक्षात आल्या नाहीत. त्यामुळे गेल्या 15 वर्षांतील अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, आता अखेर अदानीकडून धारावीच्या पुनर्विकासाला आणि विकासाच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात होईल.

हे सुद्धा वाचा

राज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का ?, आदित्य ठाकरेंचा घणाघात

‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’

पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; शिंदे सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

यात नमन समूह तांत्रिक बोलीमध्ये पात्र ठरला नाही. त्यामुळे अदानी आणि डीएलएफ या दोनच आर्थिक निविदा उघडल्या गेल्या. अदानी समूहाची बोली 5,069 कोटी रुपयांची होती, तर डीएलएफची बोली 2,025 कोटी रुपये होते. राज्य सरकारच्या मान्यतेने आता पुढील प्रक्रिया सुरू होईल, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी “लय भारी”ला सांगितले. धारावीच्या पुनर्विकासासाठी विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) देखील तयार केले जाणार आहे.

या 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पातील विजेत्याची निवड सर्वोच्च प्रारंभिक गुंतवणूक प्रतिज्ञापत्राच्या आधारावर केली जाते. येत्या 17 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आणि पुढील सात वर्षांत पूर्ण पुनर्वसन करण्याचे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे. 2019 मध्ये अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर राज्य सरकारने यंदा 1 ऑक्टोबर रोजी धारावीच्या पुनर्विकास आणि पुनर्वसनासाठी जागतिक निविदा प्रक्रिया पुन्हा सुरू केली होती. 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या प्री-बिड बैठकीत भारत, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण कोरियातील आठ कंपन्यांनी धारावीच्या पुनर्विकासात रस दाखवला होता. तथापि, केवळ तीन कंपन्यांनी पुनर्विकासासाठी निविदा सादर केल्या.

300 एकरमध्ये पसरलेले धारावी हे औषध, चामडे, पादत्राणे आणि कपडे तयार करणाऱ्या अनेक लहान-मोठ्या, असंघटित उद्योगांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. हे मध्य मुंबईतील व्यावसायिक केंद्र, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि दक्षिण मुंबईच्या अगदी जवळ आहे. अंदाजे एक कोटी लोकसंख्येसह, धारावी ही जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. 2008 मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर धारावीला जगभर लोकप्रियता मिळाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी