मुंबई

Aditya Thackeray : ‘ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा हे केवळ बालिश चाळे’, सुषमा अंधारेंचा पलटवार

शिवसेना सोडून गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र शिंदे गट स्थापन केल्यामुळे अनेक आमदार, खासदारांनी शिंदे गटात जाणे पसंत केले आहे, त्यामुळे शिवसेनेला कमालीची गळती लागल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी आणि शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहेत. शिवसंवाद यात्रेच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहोचत आक्रमकपणे विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. दरम्यान ठाकरेंच्या या सक्रीय होण्यावरून शिंदेगटातील अनेकजण टीका करण्यात धन्यता मानत आहेत. दरम्यान, रामदास कदम यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती, त्याला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत कदमांना चपराक लगावली आहे.

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष करून त्यांनी त्यांच्या लग्नावरून डिवचले होते, त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना फटकारले असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा हे केवळ बालिश चाळे आहेत. बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर आदित्यच्या लग्नाची काळजी घ्यायला त्याचे मायबाप खंबीर आहेत. त्यासाठी रामदास कदमांनी आपलं वधूवर सूचक मंडळ घेऊन लूडबूड करू नये. आम्ही त्यासाठी खंबीर आहोत असे म्हणून अंधारे यांनी सूनावले आहे.

हे सुद्धा वाचा…

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यात कोणाची गर्जना होणार, न्यायालयाचा उद्या निकाल

Raju Srivastav Passed Away : हास्यवीर राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Prakash Ambedkar : ‘आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत’

आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्यावरून बोलताना लगेचच नरेंद्र मोदींच्या मुद्याला सुद्धा सुषमा अंधारे यांनी स्पर्ष केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. अंधारे म्हणाल्या, बघा, मोदींचं लग्न झालं. त्यांची काहीतरी अडचण होती, त्यांना वाटलं आपण वेगळं राहायचं. पण हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मोदींच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा. मोदींच्या या निर्णयामुळे त्यांच्या कामावर कसं का प्रश्नचिन्ह निर्माण करायचं? आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा काढून तुम्हाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का? तुम्हाला वेदान्ता फॉक्सकॉन परत आणता येणार आहे का? शेतकऱ्यांचे, महिला सुरक्षेचे प्रश्न सोडवता येणार आहेत का? असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.

सुषमा अंधारे पुढे म्हणतात, आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची काळजी करायला त्यांचे आईवडील समर्थ आहेत. त्याची काळजी मिंधे सेनेने करण्याची गरज नाही. अमृताजी पक्षात नाहीत तरी ते त्यांचं मॉडेलिंगचं करियर सोडून इकडं येतात. आम्ही कधी त्याबद्दल काही चिंता व्यक्त केली आहे का? असा मिश्किल टोला अंधारे यांनी शिंदे सेनेला लगावला. त्यांचे यजमान मुख्यमंत्री असताना त्यांच्या शोची विक्री करण्यासाठी पोलिसांना वेठीस धरायचे, मेहनत घ्यायचे ना. कारण ते समर्थ आहेत ते करायला. बँकेत खाती उघडायलाही ते सांगत होते ना. ते समर्थ आहेत, आपण कशाला त्यात पडायचं. ज्याचा त्याचा प्रश्न ज्याला त्याला सोडवू द्या ना असे म्हणून सुषमा अंधारेंनी शिंदे सेना आणि भाजप अशा दोघांची एकाच दगडाच शिकार केल्याचे पाहायला मिळाले.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago