31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeमुंबईAditya Thackeray : 'संयुक्त महाराष्ट्राचं खच्चीकरण होऊ न देणं आपलं कर्तव्य आहे!'...

Aditya Thackeray : ‘संयुक्त महाराष्ट्राचं खच्चीकरण होऊ न देणं आपलं कर्तव्य आहे!’ आदित्य ठाकरेंचं खास ट्विट

आदित्य यांनी फ्लोरा फाऊंटन येथे जमलेल्या गर्दीचा आणि हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाचा फोटो शेअर करत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आठवण करुन दिली आहे. सध्या महाराष्ट्रापासून मुंबई वेगळा करण्याचा डाव घातल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने होतो.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे झालेल्या विशाल मोर्चाने मोठी ताकद दिली. मराठी माणसांची संयुक्त महाराष्ट्रासाठीची एकजुट होण्यास तोच मोर्चा आणि आजचा दिवस म्हणजे 21 नोव्हेंबर 1956 हाच दिवस कारणीभूत ठरला. संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेल्या लढ्यात 107 जणांनी आपलं बलिदान दिलं. त्यामुळे, मराठी माणसांचं मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरलं आणि 1 मे 1060 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. याच घटनेची आठवण करून देणारे एक ट्विट महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शेअर केले आहे.

“महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याच्या निर्णयाविरूद्ध महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याच्या निर्णयाविरूद्ध आजच्याच दिवशी 1956 साली फ्लोरा फांऊटनला मोठा मोर्चा निघाला,ज्यावर दडपशाहीने गोळीबार होऊन अनेकांना हौतात्म्य आलं.रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईला जपणं, संयुक्त महाराष्ट्राचं खच्चीकरण होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे!”, अशा शब्दात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या दिवसाची आठवण करुन दिली.

हे सुद्धा वाचा

Supriya Sule : ‘श्रद्धा हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करा!’ सुप्रिया सुळेंची मागणी

Solapur Mahanagarpalika : महिला आयुक्तांनी स्वीकारला सोलापूर महापालिकेचा पदभार

Cricket News : बाबो! वनडे सामन्यांत 277 धावा; धोनीच्या शिलेदारानं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम

आदित्य यांनी फ्लोरा फाऊंटन येथे जमलेल्या गर्दीचा आणि हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाचा फोटो शेअर करत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आठवण करुन दिली आहे. सध्या महाराष्ट्रापासून मुंबई वेगळा करण्याचा डाव घातल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने होतो. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट करत मुंबई वेगळी करण्याचा कट रचणाऱ्यांना ईशारा दिला असल्याचे भाकित वर्वण्यात येतं आहे.

दरम्यान, आजच्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळपासूनच फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्यावर जळजळीत निषेध होत होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घाला असे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी